भारताची महिला बॉक्सर नीतू घनघसने बुधवारी भारतासाठी एक पदक निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लॉयडचा पराभव केला. 48 किलो वजनी गटात 21 वर्षीय नीतूने सुरुवातीपासूनच क्लॉयडवर शानदार विजय मिळवला.
दरम्यान, पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात भारताने बुधवारी आणखी एक पदक निश्चित केले. मोहम्मदने हे पदक निश्चित करताना नामिबियाच्या बॉक्सरला एकतर्फी पराभूत केले. मोहम्मदने या सामन्यात नामिबियाच्या ट्राईअगेन मॉर्निंग डेवोले याचा 4-1 अशा गुणांनी धुव्वा उडविला.