स्पोर्ट्स

बजरंग पुनिया कांस्य पदकाचा मानकरी

backup backup

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कझाकिस्तानच्या डाऊलेट नियाझबेकोव्हशी कांस्य पदकासाठी भिडला. त्याने सामन्यावर एकहाती वर्चस्व राखत ८ – ० अशा गुणफरकाने कांस्य पदकावर नाव कोरले.

बजरंगने पहिल्यापासून सामन्यावर पकड मिळवून दोन गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने चार गुणांचा कमाई करत आघाडी ६ – ० अशी नेली.

सामन्यास काही सेकंद शिल्लक असताना त्याने कझाकिस्तानच्या डाऊलेटच्या पायावर आपली पकड मजबूत करत दोन गुणांची कमाई केली. अखेर बजरंग पुनियाने सामना ८ – ० असा सहज जिंकत कांस्य पदकावर आपले नाव कोरले.

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे सहावे पदक आहे. भारताने यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सहा पदके जिंकली होती. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याच्याशी बरोबरी झाली आहे. जर भालाफेकपटू नीरज चोप्राने पदकाला गवसणी घातली तर यंदाचे टोकियो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरेल.

SCROLL FOR NEXT