स्पोर्ट्स

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल विजयी

Arun Patil

सिंगापूर : वृत्तसंस्था : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, एच. एस. प्रणय यांनी विजयी सलामी दिली, तर किदांबी श्रीकांत पहिल्याच फेरीत उलटफेरीचा शिकार ठरला, तर पी. कश्यपला पराभवाचा सामना करावा लागला.

महिला गटात जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने बेल्जियमच्या लियाने टॅनेवर सहज विजय मिळविला. सिंधूने हा सामना 21-15, 21-1 असा एकतर्फी जिंकला. दुसर्‍या फेरीत सिंधूची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन एनगुएन हिच्याशी पडणार आहे.

दुसर्‍या एका सामन्यात सायना नेहवालने पाचव्या मानांकित बिंय जियो हिला 21-9, 23-21 असे पराभूत केले, तर अस्मिताने हान यी हिच्यावर 21-16, 21-11 अशी मात केली.

पुरुष गटात किदांबी श्रीकांतला भारताच्याच के. मंजुनाथने चुरशीच्या सामन्यात 21-17, 15-21, 21-18 असे पराभूत केले. मंजुनाथची दुसर्‍या फेरीत आयर्लंडच्या एनहाट एनगुएन याच्याशी गाठ पडणार आहे.दरम्यान, पी. कश्यपलाही पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT