फिफा वर्ल्डकप 2022 मधील संभाव्य विजेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या ब्राझीलने आपली वर्ल्डकप मोहीम विजयाने सुरू केली. ग्रुप 'जी'च्या सामन्यात सर्बियाचा 2-0 असा पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान ब्राझीलचा कर्णधार नेमारला जबर दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील ग्रुप सामन्यांना तो मुकणार आहे. त्याला पुढचे 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असे संघाच्या डॉक्टरांनी सांगितले. नेमारने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूसोबत टक्कर झाल्यानंतर 79 व्या मिनिटाला मैदान सोडले होते. त्याचा घोटा मुरगळला होता. नेमारची दुखापत पाहता तो वर्ल्डकपला मुकणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
नेमारच्या दुखापतीविषयी बोलताना लासमार यांनी सांगितले की, 'आम्हाला नेमारच्या दुखापतीबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी अजून 24 ते 48 तास लागणार आहेत. आम्ही त्याचा एमआरआय करण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही. आम्ही उद्या पुन्हा त्याच्या दुखापतीबाबत तपासणी करणार आहोत.' ते पुढे म्हणाले की, 'आपल्याला अजून वाट पाहण्याची गरज आहे. आम्ही याबाबत कोणतेही मोघम वक्तव्य करणार नाही. नेमारशी पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र नेमारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नेमार सध्या दिग्गज पेले यांच्या ब्राझीलसाठी 77 गोल केलेल्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून दोन गोल मागे आहे.'