स्पोर्ट्स

धोनीमुळे टीम इंडिया बळकट होईल : सलमान बट

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून धोनीला जबाबदारी दिल्यास संघाला खूप मोठा फायदा होईल, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट याने व्यक्त केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त झाला. धोनीने आपल्या कार्यकाळात अनेक चषक जिंकले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अलीकडेच टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या पराभवानंतर लोकांना या दिग्गजाची आठवण येऊ लागली. महेंद्रसिंग धोनी छोट्या प्रकारामध्ये संघाचा मार्गदर्शक म्हणून टीम इंडियात परत येऊ शकतो, अशा अनेक बातम्या आल्या होत्या. त्यावर बट याने आपले मत मांडले आहे.

आपल्या यू ट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट म्हणाला की, 'धोनीच्या येण्याने भारतीय संघाला खूप फायदा होईल. तो ज्या प्रकारचा कर्णधार होता. त्याचे नियोजन आणि त्याचा शांत स्वभाव संघासाठी शस्त्र म्हणून काम करेल.' बट पुढे म्हणाला, 'तो ज्याप्रकारे विचार करतो याचा खेळाडूंना निश्चितच फायदा होईल. मेन्टॉर म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट खूप पुढे जाईल. तुम्ही अनुभवावर मात करू शकत नाही. कारण त्या व्यक्तीने आयुष्यात तेच सर्व अनुभव घेतलेले असतात त्यामुळे तुम्ही त्याच्या विचार करण्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत.'

याशिवाय सलमानने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवरही आपले मत मांडले. सूर्यकुमारला सलामीवीर म्हणून संधी द्यावी का, या प्रश्नाच्या उत्तरात सलमान बट्ट म्हणाला, 'सूर्यकुमार हा असा फलंदाज आहे की तो कोणत्याही परिस्थितीत पॉवर प्लेसारखा खेळतो. त्याची फलंदाजी कशी असावी यावर माझा विश्वास असला तरी संघाला त्याची गरज कुठे आहे हे त्याच्या उपयुक्ततेवर अवलंबून आहे. यावर भारतीय संघ व्यवस्थापनच योग्य तो निर्णय घेईल.'

'मला कोचिंगबद्दल जास्त माहिती नाही, पण व्हीव्हीएस लक्ष्मण हा एक उत्तम खेळाडू आहे. सेहवागही चांगला खेळायचा पण कोचिंगच्या बाबतीत मी धोनीची निवड करू इच्छितो जो संघासाठी इतरांपेक्षा चांगला निकाल देऊ शकेल.' तो पुढे म्हणाला, 'जर आपण रणनीतीने श्रेष्ठ आणि नेतृत्वाबद्दल बोललो, तर कोचिंग हे नेतृत्वही असते, मेन्टॉरशिपही असते, त्यामुळे मी धोनीला जितका यशस्वी कर्णधार पाहिला आहे, तितकाच टीम इंडियासाठी माझी पहिली पसंती महेंद्रसिंग धोनी असेल.'
– सलमान बट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT