स्पोर्ट्स

टीम इंडियात संधी न दिल्याने राहुल तेवतिया भडकला

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार्‍या आगामी दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करेल, तर राहुल त्रिपाठीचा पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. 17 सदस्यीय टीम इंडियामध्ये उर्वरित इतर खेळाडूंची निवड होणे अपेक्षित होते.

राहुल तेवतियाला आयर्लंड दौर्‍यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. द. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेसाठी तेवतियाची निवड होईल अशी अपेक्षा होती, पण निवड समितीने त्याला संधी दिली नाही. अशातच आता आयर्लंड दौर्‍यासाठीही त्याची भारतीय संघात निवड न झाल्याने तेवतियाने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.

तेवतिया आयपीएल 2022 च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळला. या अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2022 मध्ये 147.62 च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या आणि त्याने संघाच्या यशात अनेक महत्त्वपूर्ण खेळींचे योगदान दिले. तथापि, भारताकडे सध्या हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे दोन फिनिशर आहेत.

SCROLL FOR NEXT