स्पोर्ट्स

जखमी गुरदीपला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक

backup backup

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी आपला जलवा कायम ठेवताना दहावे पदक मिळवले. भारताच्या गुरदीप सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. 26 वर्षीय गुरदीपने स्नॅचमध्ये 167 आणि क्‍लीन अँड जर्कमध्ये 223 असे एकूण 390 किलो वजन उचलून पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमधील हा शेवटचा इव्हेंट होता. विशेष म्हणजे, जखमी असतानाही गुरदीपने पदकापर्यंत मजल मारली.

पंजाबमधील खन्‍नाजवळील माजरी रसुलरा गावातील 26 वर्षीय शेतकर्‍याचा मुलगा असलेल्या गुरदीप सिंगने पोडियम फिनिशसाठी 390 किलो (167 किलो+ 223 किलो) साठी सर्वोत्तम प्रयत्न केले आणि हेवीवेट प्रकारात भारताला पहिले पदक मिळाले. आपल्या 223 किलो क्लीन अँड जर्कच्या प्रयत्नाने सिंगने वैयक्‍तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही लिहिला आहे. या प्रकारात पाकिस्तानचा वेटलिफ्टर मुहम्मद नूह बटने 405 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.

माझ्या मनगटात दुखापत झाली, नाही तर मी किमान रौप्यपदक मिळवले असते. -जखमी गुरदीप

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT