स्पोर्ट्स

काईल जेमिसन आयपीएलला मुकणार

Arun Patil

चेन्नई, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा एक दिग्गज खेळाडू न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन आयपीएल 2023 च्या संपूर्ण सत्रामधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

काईल जेमिसनला पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो 9 महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. आता तो आयपीएल 2023 मध्येही खेळू शकणार नाही. जून 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळून इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जेमिसनने पुनरागमन करणे अपेक्षित होते. मात्र, त्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळविण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 31 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएल सीझनसाठी काईल जेमिसनला चेन्नई सुपर किंग्जने 1 कोटीमध्ये खरेदी केले. जेमिसनने आतापर्यंत आयपीएलच्या 9 सामन्यांत 9 विकेटस् घेतल्या आहेत. 2021 च्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला होता.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी 'सेन रेडिओ'ला सांगितले की, काईलसाठी हा एक आव्हानात्मक आणि कठीण काळ आहे. जेमिसनने यापूर्वी आशा व्यक्त केली होती की त्याची दुखापत विश्रांतीने बरी होईल; परंतु ती बरी झाल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेचा पर्याय निवडणे भाग पडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT