स्पोर्ट्स

इंग्लंड संघात आक्रमक फिल सॉल्टचा समावेश

दिनेश चोरगे

अ‍ॅडलेड :  टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना गुरुवारी खेळविला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघात मोठा बदल करण्यात आला आहेे. फलंदाज डेविड मलान जखमी झाल्याने त्याच्या स्थानी आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या फिल सॉल्टचा समावेश इंग्लंड संघात करण्यात आला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात डेविड मलान जखमी झाला होता. यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकला नव्हता. डेली मेलच्या माहितीनुसार डेविड मलानचा मांडीचा सांधा दुखावला आहे. यामुळे तो वर्ल्डकपमधूनच बाहेर पडला आहे. यामुळेच सलामी फलंदाज म्हणून इंग्लंडने फिल सॉल्टला संधी दिली आहे. सॉल्टने आतापर्यंत अकरा सामने खेळले आहेत. त्याने 164.3 च्या स्ट्राईक रेटने 235 धावा जमविल्या आहेत.

SCROLL FOR NEXT