Zimbabwe vs India 2nd T20I  Live
भारताने दुसऱ्या टी २० सामन्यात झिम्बाब्वेसमोर २३४ धावांचा डोंगर उभा केला आहे.   BCCI (X account)
स्पोर्ट्स

Zimbabwe vs India 2nd T20I|भारताने पराभवाचा वचपा काढला, झिम्बाब्वेवर मिळवला 100 धावांनी विजय...

पुढारी वृत्तसेवा

भारताचा 100 धावांनी विजय

भारताने दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. याआधी शनिवारी (दि.6) झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला होता. मात्र, रविवारी भारतीय संघाने यजमानांकडून मागील पराभवाचा बदला घेतला.

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 234 धावा केल्या. या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने 229/2 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 18.4 षटकांत 10 गडी गमावून केवळ 134 धावा करता आल्या.

झिम्बाब्वेची सातवी विकेटही पडली

झिम्बाब्वेला 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सातवा धक्का बसला. जुरेलने मसाकादजा धावबाद केला आहे. त्याला एकच धाव करता आली. ल्यूक जोंगवे नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

झिम्बाब्वेला सहावा धक्का

झिम्बाब्वेला सहावा धक्का बसला आहे. रवी बिश्नोईने मदंडेला बाद केले. तो खाते न उघडताच बाद झाला. वेलिंग्टन मसाकादझा आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

कॅम्पबेल 10 धावा करून बाद

झिम्बाब्वेला पाचवा धक्का बसला आहे. वॉशिग्टन सुंदरला या सामन्यातील पहिले यश मिळाले आहे. त्याने 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅम्पबेलला झेलबाद केले. कॅम्पबेलने संथगतीने 18 चेंडूत 10 धावा बनवल्या आहेत.

कर्णधार रजा चार धावांवर बाद

कर्णधार रझा चार धावा करून बाद झाला. त्याला आवेश खानने जुरेलच्या हाती झेलबाद केले. कॅम्पबेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. चार षटकांनंतर धावसंख्या ४६/४ आहे. आवेश खानने या सामन्यातील दुसरा बळी मिळवला आहे.

झिम्बाब्वेला तिसरा धक्का बसला आहे

अवेश खानने 41 धावांच्या स्कोअरवर झिम्बाब्वेला तिसरा धक्का दिला. त्याने मायर्सला रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. तो एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार सिकंदर रझा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवले २३५ धावांचे आव्हान

भारताने झिम्बाब्वेसमोर केवळ २ गडी गमावत २३४ धावांचा डोंगर उभा केला आहे.

भारताचे धावांचे द्विशतक

रिंकू सिंगने षटकात मारत भारताच्या धावांचे द्विशतक पूर्ण केले. ऋतुराज गायकवाडने १ षटकार आणि १० चौकारांच्या तुफान खेळीने भारताची धावसंख्या २०० पार झाली.

टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू

  • टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू

  • २१ वर्ष २७९ दिवस- यशस्वी जयस्वाल

  • २३ वर्ष १४६ दिवस- शुभमन गिल

  • २३ वर्ष १५६ दिवस- सुरेश रैना

  • २३ वर्ष ३०७ दिवस- अभिषेक शर्मा

अभिषेकने सुरेश रैनाचा विक्रम मोडला

भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने रविवारी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ४६ चेंडूत पहिले टी-२० मधील शतक झळकावले. अभिषेकने या कामगिरीने सुरेश रैनाचा विक्रम मोडला. अभिषेक सर्वात कमी डावांत शतकी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ दुसऱ्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. याआधी दीपक हुड्डाने तिसऱ्या डावांत शतक ठोकले होते.

अभिषेकचे वेगवान शतक

अभिषेकची १०० धावसंख्या ही भारताकडून झिम्बाब्वेविरुद्ध केलेली टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

अभिषेक शर्माने पाडला षटकारांचा पाऊस

आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ४६ चेंडूत शतक ठोकले. ८ षटकार, ७ चौकारासह त्याने शतक पूर्ण केला. शतक पूर्ण झाल्यानंतर अभिषेक झेलबाद झाला. भारताच्या १४ षटकांत २ बाद १४७ धावा केल्या होत्या.

भारताचे ११ षटकांत धावांचे शतक पूर्ण 

भारताने ११ षटकात धावांचे शतक पूर्ण केले. अभिषेक शर्मा ५ षटकार, ७ चौकारांसह ८२ धावांवर खेळत आहे.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरु आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताच्या युवा शिलेदारांचा १३ धावांनी पराभव केला होता. पण या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय युवा शिलेदारांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजीची पिसे काढली. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरुवातीलाच भारताला पहिला धक्का बसला. मुजराबानीने शुभमन गिलला झेलबाद केले. शुभमन केवळ २ धावा करु शकला. त्यानंतर अभिषेक शर्माने भारताचा खेळ सावरत तुफान फलंदाजी केली. अभिषकने ४७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकार मारत शतक ठोकले. त्याचे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक आहे. तर ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. रिंकू सिंगनेही ५ षटकार लगावत २२ चेंडूत ४८ धावा केल्या. यामुळे भारताने झिम्बाब्वे समोर केवळ २ गडी गमावत २३४ धावांचा डोंगर उभा केला.

SCROLL FOR NEXT