स्पोर्ट्स

Ireland vs Zimbabwe : झिम्बाब्वेची 'सुपर-८' मध्ये ऐतिहासिक धडक! वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळा

T20 World Cup Zimbabwe in Super 8 : पावसामुळे झिम्बाब्वे vs आयर्लंड सामना रद्द

रणजित गायकवाड

Australia Knocked Out of T20 World Cup as Zimbabwe vs Ireland Match Washed Out Zimbabwe qualify for Super Eights

पल्लेकेले : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये मंगळवारी (दि. १७) एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील साखळी फेरीचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या एका गुणासह झिम्बाब्वेने अधिकृतपणे 'सुपर-८' फेरीचे तिकीट मिळवले आहे. मात्र, या निकालाचा सर्वात मोठा फटका बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बसला असून कांगारूंना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. तसेच आयर्लंड संघही बाहेर पडला आहे.

पावसाचाच खेळ; ना टॉस, ना सामना

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी पावसाने दुपारपासूनच मुक्काम ठोकला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर इतका होता की सामन्याचा टॉस देखील होऊ शकला नाही. मैदानावर पूर्णपणे कव्हर्स झाकलेली होती आणि ग्राऊंडस्टाफने साचलेले पाणी काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण निसर्गापुढे कोणाचेही चालले नाही. अखेर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता पंचांनी दोन्ही कर्णधारांशी चर्चा करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सामना रद्द झाल्याची घोषणा होताच झिम्बाब्वेच्या समर्थकांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. ड्रेसिंग रूमबाहेर समर्थकांनी आपल्या खेळाडूंसह नाचून आणि गाणी गाऊन 'सुपर-८' मधील प्रवेश साजरा केला. झिम्बाब्वेचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध असून त्यानंतर हा संघ सुपर-८ फेरीसाठी भारतात रवाना होईल.

दुसरीकडे, या पावसामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपल्याने क्रिकेट विश्वात आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुणतालिकेतील गणितामुळे झिम्बाब्वेला मिळालेला एक गुण ऑस्ट्रेलियासाठी 'तडीपार' ठरणारा ठरला.

'सुपर-८' चे समीकरण स्पष्ट

झिम्बाब्वेच्या या प्रवेशामुळे 'सुपर-८' मधील गुप एक्सचे चित्र स्पष्ट झाले आहे. या गटात आता भारत, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. हे सर्व सामने भारतात खेळवले जातील. दुसरीकडे ग्रुप वायमध्ये श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान/अमेरिका यांपैकी एक संघ असेल. या गटाचे सामने श्रीलंकेतील कोलंबो आणि पल्लेकेले येथे पार पडतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT