Mahvesh On Yuzvendra Chahal pudhari
स्पोर्ट्स

Mahvesh On Yuzvendra Chahal: युझवेंद्रसोबत वाढली जवळीक... कुटुंबीय होते अस्वस्थ? महवशने केला मोठा खुलासा

Anirudha Sankpal

Mahvesh On Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि आरजे महवश यांची खूपच जवळीक निर्माण झाली होती. या दोघांचा सामाजिक वावर हा नेहमी चर्चेचा विषय ठरत होता. धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर युझी अन् महवश एकत्र दिसत होते. या दोघांमध्ये लव्ह रिलेशन आहे का अशी चर्चा देखील सुरू झाली होती. दोघांनी एकत्र सुट्टी देखील घालवली होती. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली अन् सर्वांना धक्काच बसला. आता महवशने याबाबत खुलासा केला आहे.

महवशच्या कुटुंबीयांशी झाली होती चहलची भेट

आरजे महवशने युझवेंद्र चहलसोबत आपल्या नात्याचे आणि ब्रेकअप बाबतच्या अफवांवर खुलासा केला आहे. महवशला विचारण्यात आलं की युझवेंद्र चहल तिच्या कुटुंबीयांशी देखील भेटला होता. त्यावेळी युझीने त्यांच्यासोबत एक फ्रेंडली बाँड तयार केला होता. मात्र हे सुरू असतानाच महवशने युझीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो का केलं?

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत महवशने याबाबत उत्तर दिलं. ती म्हणाली, 'माझ्या कुटुंबीयांना युझवेंद्र चहलसोबतच्या मैत्रीवर कधी आक्षेप घेतला नाही. कारण त्यांना माहिती होतं की आक्षेप घेण्यासारखे आमच्या दोघांमध्ये काही नातं नव्हतं.

नातं का तुटलं?

महवश आणि चहलने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. याबाबत बोलताना महवश म्हणाली की, आम्ही एकमेकांना का अनफॉलो केलं हा विषय उगाच मोठा केले गेला. कधी कधी मित्रांमध्ये भांडण आणि अबोला निर्माण होतो. लोकं सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करतात. ही काही मोठी गोष्ट नाही.

महवशने माझ्या मनात युझीबद्दल कोणताही कटवटपणा नाही असं सांगितलं. आजही मला त्याचे भले व्हाव असंच वाटतं. महवशला वाटतं की राग आणि द्वेष इतका असला पाहिजे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला थेट रूग्णालयातच गेलेलं पहाल.

दुखात महवशने दिली साथ

धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर युझवेंद्र चहल आणि महवश यांच्यात जवळीक वाढली होती. चहल त्यावेळी घटस्फोटाच्या वेदनेतून आणि दुखातून सावरत होता. महवशने या कठिण काळात युझीची साथ दिली. मात्र दुर्दैवाने आता त्यांची मैत्री तुटली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT