लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात भक्कम स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरू झाला असताना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर आपली पकड आणखी मजबूत केली. सामन्याने आता अत्यंत रोमांचक वळण घेतले असून, निकाल तिसऱ्याच दिवशी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 65 षटकांत 207 धावांत संपुष्टात आला. यासह त्यांनी पहिल्या डावातील 74 आघाडीच्या जोरावर द. आफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य ठेवले. शुक्रवारी (दि. 13) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे सुरू झाला. पहिल्या तासाभरातच द. आफ्रिका उरलेल्या दोन विकेट घेऊन कांगारूंचा ऑलआऊट करेल असे वाटले होते. त्यात त्यांना सुरुवातील यश आले. रबाडाने लायनला पायचित पकडले आणि तंबूत पाठवले. पण यानंतर स्टार्कने हेझलवूडच्या साथीने डाव पुढे नेला आणि आघाडी 265 धावांपर्यंत पोहचवली. आफ्रिकन फलंदाजी या आव्हानाला कसे प्रत्युत्तर देते, यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुस-या डावात 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या होत्या. यासह त्यांची आघाडी 218 पर्यंत पोहचली होती. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन नाबाद परतले होते. यानंतर शुक्रवारी (दि. 13) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे सुरू झाला. पहिल्या तासाभरातच द. आफ्रिका उरलेल्या दोन विकेट घेऊन कांगारूंचा ऑलआऊट करेल असे वाटले होते. त्यात त्यांना सुरुवातील यश आले. रबाडाने लायनला पायचित पकडले आणि तंबूत पाठवले. पण यानंतर स्टार्कने हेझलवूडच्या साथीने डाव पुढे नेला. दोघांनी दहाव्या विकेटसाठी 59 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाची आघाडी आघाडी 281 धावांपर्यंत पोहचवली.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी संयमी खेळी करत आफ्रिकेच्या गोलंदाजांना झुंजवले आहे. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी काही झटके दिले असले तरी, ऑस्ट्रेलियाचा तळाचा फळीने चांगली कामगिरी केली. आता 282 धावांचे आव्हान द. आफ्रिकेचा संघ पुढील किती दिवसात पार करतो की नाही हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलियाकडे भक्कम आघाडी असून, त्यांच्या गोलंदाजांनी फॉर्म दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर आता मोठे लक्ष्य उभे राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या फायनलमध्ये स्पष्टपणे वरचढ दिसत आहे आणि विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव समाप्त : पहिल्या सत्राच्या शेवटी मार्करमने जोश हॅझलवूडला (17 धावा, 53 चेंडू) बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 207 धावांत संपुष्टात आणला. स्टार्क 58 धावांवर नाबाद राहिला, ज्यामुळे तो दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. रबाडाने (4/59), यान्सेनने 3/58 आणि लुंगी एनगिडीने 3/38 यांच्या गोलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखण्यात द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले होते, पण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 138 धावांवर आटोपला. कांगारू कर्णधार पॅट कमिन्सने सहा बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली.