नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपट्टू सागर धनखडच्या हत्या प्रकरणातील आरोपी ऑलिम्पियन कुस्तीपट्टू सुशील कुमारला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी नीरज ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. कुस्तीपट्टू सुशील कुमार आणि त्याच्या खास पोलिसांच्या टीमने अटक केली आहे.
अधिक वाचा : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दणक्यानंतर बाबा रामदेवांच्या पतंजलीची 'सारवासारव'!
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टर शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास सेल टीमने दोघांना अटक केली. यातील कुस्तीपट्टू सुशील कुमार आणि अजय उर्फ सुनील यांना अटक केली. यांच्यावर ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
अधिक वाचा : ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार का झाला 'मोस्ट वॉटेड'; काय आहे कोल्हापूरशी संबंध?
यापूर्वी सुशील कुमारच्या शोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाबमध्ये छापे टाकले होते. पोलिसांनी दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले पण सुशील सापडत नव्हता. सुशील उत्तराखंडला जात असल्याची माहिती पोलिसांना प्रथम मिळाली. त्यानंतर पोलिस पाच राज्यांत त्याच्या अटकेसाठी सातत्याने प्रयत्नशील होते.
यापूर्वी शनिवारी दिल्ली पोलिसांनी सुशीलला पंजाबमधून अटक केल्याचे सांगण्यात आले परंतु त्याच्या अटकेला दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री कुस्तीपट्टूंमध्ये काही भांडणे झाल्याचे समोर आले. यात काही कुस्तीपटू गंभीर जखमी झाले, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सागर धनकडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर हा ज्युनियर राष्ट्रीय चँपियन कुस्तीपटू होता.