स्पोर्ट्स

WPL 2026 Auction Live : दुसऱ्या अ‍ॅक्सिलरेटर फेरीत खेळाडूंची चांदी, धडाधड विक्रीनंतर लिलाव संपुष्टात

WPL Auction 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ साठी मेगा लिलाव नवी दिल्ली येथे होत आहे. भारतीय स्टार खेळाडूंना कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या आहेत. दीप्ती शर्मा यात 3.2 कोटींसह टॉपवर राहिली.

रणजित गायकवाड

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या आगामी हंगामासाठी आज मेगा लिलाव होत आहे. एकूण २७७ खेळाडूंसाठी लिलाव सुरू आहे आणि ७३ खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

सायका इशाक (आधार मूल्य ₹30 लाख) हिला मुंबई इंडियन्सने ₹30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

जी तृषा (आधार मूल्य ₹10 लाख) हिला यूपी वॉरियर्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

प्रत्युषा कुमार (आधार मूल्य ₹10 लाख) हिला आरसीबीने ₹10 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

मिली इंलिंगवर्थ (आधार मूल्य ₹10 लाख) हिला मुंबई इंडियन्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

डेनियल वाइट हॉज (आधार मूल्य ₹50 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹50 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले.

मिनू मणि (आधार मूल्य ₹40 लाख) हिला दिल्ली कॅपिटल्सने ₹40 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

प्रतिका रावल (आधार मूल्य ₹50 लाख) हिला यूपी वॉरियर्सने ₹50 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

राजेश्वरी गायकवाड़ (आधार मूल्य ₹40 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹40 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

डी हेमलता (आधार मूल्य ₹30 लाख) हिला आरसीबीने ₹30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

आयुषी सोनी (आधार मूल्य ₹30 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹30 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

क्लोए ट्रियोन (आधार मूल्य ₹30 लाख) हिला यूपी वॉरियर्सने ₹30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

लुसी हेमिल्टन (आधार मूल्य ₹10 लाख) हिला दिल्ली कॅपिटल्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

त्रिवेनी वशिष्ठ (आधार मूल्य ₹20 लाख) हिला मुंबई इंडियन्सने ₹20 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

सुमन मीणा (आधार मूल्य ₹10 लाख) हिला यूपी वॉरियर्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

गौतमी नाइक (आधार मूल्य ₹10 लाख) हिला आरसीबीने ₹10 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

नाला रेड्डी (आधार मूल्य ₹10 लाख) हिला मुंबई इंडियन्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

शिवानी सिंह (आधार मूल्य ₹10 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹10 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

तारा नोरिस (आधार मूल्य ₹10 लाख) हिला यूपी वॉरियर्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

हैपी कुमारी (आधार मूल्य ₹10 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹10 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

नंदिनी शर्मा (आधार मूल्य ₹20 लाख) हिला दिल्ली कॅपिटल्सने ₹20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

किम गार्थ (आधार मूल्य ₹50 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹50 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

यस्तिका भाटिया (आधार मूल्य ₹30 लाख) हिला गुजरात जायंट्सने ₹50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

सिमरन शेख (आधार मूल्य ₹10 लाख) हिला यूपी वॉरियर्सने ₹10 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

पूनम खेमनार (आधार मूल्य ₹10 लाख) हिला मुंबई इंडियन्सने ₹10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

अनसोल्ड राहिलेले प्रमुख खेळाडू (Unsold Players)

या लिलावात काही नामांकित खेळाडू विक्रीविना (Unsold) राहिले:

एस मेघना (आधार मूल्य ₹30 लाख)

खुशी भाटिया (आधार मूल्य ₹10 लाख)

शबनम शकील (आधार मूल्य ₹10 लाख)

सहाना पवार (आधार मूल्य ₹10 लाख)

सयाली सत्करे (आधार मूल्य ₹30 लाख)

इजाबेल वोंग (आधार मूल्य ₹30 लाख)

हीदर नाइट (आधार मूल्य ₹50 लाख)

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या 'एक्सलरेटेड ऑक्शन'मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) संघाने ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडू ग्रेस हॅरिसला विकत घेतले.

ग्रेस हॅरिसला तिच्या ३० लाख रुपये आधार मूल्यापेक्षा जास्त किंमत मिळाली आणि RCB ने तिला ७५ लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले.

यूपी वॉरियर्सने शिप्रा गिरी हिला तिच्या १० लाख रुपये आधार मूल्यावर खरेदी केले.

दिल्ली कॅपिटल्सने ममता मदिवाला हिला तिच्या १० लाख रुपये आधार मूल्यावर संघात घेतले.

अनसोल्ड खेळाडू : या व्यतिरिक्त, भारताची एस मेघना (३० लाख रुपये आधार मूल्य), इंग्लंडची एमी जोन्स (५० लाख रुपये आधार मूल्य), ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राउन (३० लाख रुपये आधार मूल्य) आणि अलाना किंग (४० लाख रुपये आधार मूल्य) यांसह वृंदा दिनेश, हुमायर काजी, जिंतिमनी कलिता आणि मिली एलिंगवर्थ या खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही आणि त्या अनसोल्ड राहिल्या.

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या 'एक्सलरेटेड ऑक्शन'मध्ये गुजरात जायंट्सने अनकॅप्ड भारतीय खेळाडू अनुष्का शर्मा हिला मोठ्या रकमेत खरेदी केले.

अनुष्का शर्माला १० लाख रुपये इतके आधार मूल्य असताना, गुजरात जायंट्सने तिला ४५ लाख रुपयांना विकत घेतले.

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू निकोला कॅरी हिला मुंबई इंडियन्सने तिच्या ३० लाख रुपये आधार मूल्यावर आपल्या संघात समाविष्ट केले.

अनसोल्ड खेळाडू : या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची हीदर ग्रॅहम (५० लाख रुपये आधार मूल्य) तसेच भारताची शिवाली शिंदे (१० लाख रुपये आधार मूल्य), तेजल हसबनीस (३० लाख रुपये आधार मूल्य) आणि रबिया खान (३० लाख रुपये आधार मूल्य) या खेळाडूंना कोणतेही खरेदीदार मिळाले नाहीत आणि त्या अनसोल्ड राहिल्या.

जॉर्जिया वेहम (ऑस्ट्रेलिया) हिला ५० लाख रुपये आधार मूल्यावर सुरुवात झाली, पण गुजरात जायंट्सने तिला १ कोटी रुपयांना विकत घेतले.

भारताची अष्टपैलू खेळाडू तनुजा कंवर हिची खरेदी चुरशीची झाली आणि गुजरात जायंट्सने तिला तिच्या ३० लाख रुपये आधार मूल्यापेक्षा जास्त किंमत देऊन ४५ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले.

कनिका आहुजा हिला देखील गुजरात जायंट्सने तिच्या ३० लाख रुपये आधार मूल्यावर खरेदी केले.

मुंबई इंडियन्सने राहिला फिरदोस हिला तिच्या १० लाख रुपये आधार मूल्यावर विकत घेतले.

अनसोल्ड खेळाडू : या व्यतिरिक्त, पूनम खेमनर, तीर्था सतीश, कोमल जनजद, सहाना पवार, कॉटिनी वेब आणि तारा नॉरिस या खेळाडूंना कोणतेही खरेदीदार मिळाले नाहीत आणि त्या अनसोल्ड राहिल्या.

दिल्ली कॅपिटल्सने भारताची यष्टिरक्षक-फलंदाज तान्या भाटिया हिला तिच्या ३० लाख रुपये आधार मूल्यावर विकत घेतले.

मात्र, भारताची राजेश्वरी गायकवाड (४० लाख रुपये आधार मूल्य) आणि नुजहत परवीन (३० लाख रुपये आधार मूल्य) तसेच बांगलादेशची मरुफा अख्तर, न्यूझीलंडची लिया ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनस, सुची उपाध्याय, सलोनी डंगोर आणि लॉरा हॅरिस यांसारख्या खेळाडूंना कोणतेही खरेदीदार मिळाले नाहीत आणि त्या अनसोल्ड राहिल्या.

'एक्सलरेटेड ऑक्शन'

डॉटिन आणि पांडे महागल्या : वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डियांड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिला यूपी वॉरियर्सने ८० लाख रुपयांना खरेदी केले. भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडे (Shikha Pandey) हिलादेखील यूपी वॉरियर्सनेच २.४० कोटी रुपये या मोठ्या किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले.

काश्वी गौतमसाठी चुरस : युवा खेळाडू काश्वी गौतम (Kashvee Gautam) हिला यूपी वॉरियर्सने ६५ लाख रुपयांची बोली लावली होती, मात्र गुजरात जायंट्सने 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर करून तिला ६५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

इतर भारतीय खेळाडूंनाही मोठी किंमत:

अष्टपैलू पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिला आरसीबीने ८५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

अरुंधती रेड्डी (Arundhati Reddy) आणि सजीवन सजना (Sajeevan Sajana) या दोघींनाही ७५ लाख रुपये इतकी चांगली किंमत मिळाली. रेड्डीला आरसीबीने, तर सजनाला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले.

Unsold राहिलेल्या खेळाडू:

स्नेहा दीप्ति, मोना मेशराम, प्रिया पूनिया, किम गार्थ आणि मिनू मणि यांसारख्या काही खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही आणि त्या अविक्रीत राहिल्या.

'अनकॅप्ड' नशिबी निराशा; अनेक खेळाडू अनसोल्ड

या लिलावातील 'अनकॅप्ड' फिरकी गोलंदाजांच्या खरेदीचा तपशील आणि त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • प्रकाशिका नायक : बेस प्राईज १० लाख : अनसोल्ड

  • भारती रावल : १० लाख : अनसोल्ड

  • प्रियांका कौशल : १० लाख : अनसोल्ड

  • परुणिका सिसोदिया : १० लाख : अनसोल्ड

  • जागरवी पवार : १० लाख : अनसोल्ड

'अनकॅप्ड' वेगवान गोलंदाजांवर निराशा; सर्व अनसोल्ड

या लिलावातील 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या) वेगवान गोलंदाजांच्या खरेदीचा तपशील आणि त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे :

  • हॅपी कुमारी : बेस प्राईज १० लाख : अनसोल्ड

  • नंदिनी शर्मा : २० लाख : अनसोल्ड

  • कोमलप्रीत कौर : १० लाख : अनसोल्ड

  • मिली एलिंगवर्थ : १० लाख : अनसोल्ड

  • शबनम शकील : १० लाख : अनसोल्ड

‘अनकॅप्ड' यष्टिरक्षकांकडे फ्रँचायझींचे दुर्लक्ष

या लिलावातील 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या) यष्टिरक्षक खेळाडूंच्या खरेदीचा तपशील आणि त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • शिप्रा गिरी : बेस प्राईज १० लाख : अनसोल्ड

  • ममता मदिवाला : १० लाख : अनसोल्ड

  • खुशी भाटिया : १० लाख : अनसोल्ड

  • प्रत्युषा कुमार : १० लाख : अनसोल्ड

  • नंदिनी कश्यप : १० लाख : अनसोल्ड

'अनकॅप्ड' अष्टपैलू खेळाडूंसाठी चुरस; 'RTM' मुळे प्रेमा आरसीबीत

या लिलावातील 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या) अष्टपैलू खेळाडूंच्या खरेदीचा तपशील आणि त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

हुमायरा काझी

हुमायरा काझी हिची आधारभूत किंमत १० लाख रुपये होती. पहिल्या प्रयत्नात तिला कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नाही.

संस्कृती गुप्ता

संस्कृती गुप्ता हिची आधारभूत किंमत २० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तिला आधारभूत किमतीवर खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले.

प्रेमा रावत

प्रेमा रावत हिची आधारभूत किंमत १० लाख रुपये होती. गुजरात जायंट्सने (Gujarat Giants) तिला आधारभूत किमतीवर खरेदी केले. परंतु, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर केला. गुजरातने २० लाख रुपयांचा प्रस्ताव दिला, जो आरसीबीने स्वीकारला. अखेरीस, आरसीबीने प्रेमा रावतला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

अमनदीप कौर

अमनदीप कौर हिची आधारभूत किंमत २० लाख रुपये होती. पहिल्या प्रयत्नात ती अनसोल्ड राहिली.

जी. तृषा

जी. तृषा हिची आधारभूत किंमत १० लाख रुपये होती. पहिल्या प्रयत्नात तिला खरेदीदार मिळाला नाही.

जी. कलिता

जी. कलिता हिची आधारभूत किंमत १० लाख रुपये होती. ती पहिल्यांदा लिलावात उतरल्यावर विकली गेली नाही.

यशस्री एस.

यशस्री एस. हिची आधारभूत किंमत १० लाख रुपये होती. तिलाही पहिल्या फेरीत कोणताही खरेदीदार मिळाला नाही.

Uncapped फलंदाजांवर फ्रँचायझींचा कमी रस

या लिलावातील Uncapped (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या) फलंदाजांच्या खरेदीचा तपशील आणि त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे :

  • प्रणवी चंद्रा : बेस प्राईज १० लाख : अनसोल्ड

  • देवीना पेरिन : २० लाख : अनसोल्ड

  • वृंदा दिनेश : १० लाख : अनसोल्ड

  • दीशा कसट : १० लाख : अनसोल्ड

  • आरुषी गोयल : १० लाख : अनसोल्ड

  • दीया यादव : १० लाख या बेस प्राईजवर दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले.

  • सनिका चलाके : १० लाख : अनसोल्ड

फिरकीपटूंसाठी बोली; आशा शोभनावर मोठी गुंतवणूक!

फिरकीपटूंमध्ये केवळ लिंसी स्मिथ आणि आशा शोभना यांनाच खरेदीदार मिळाला, त्यातही आशा शोभनावर सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली.

प्रिया मिश्रा

प्रिया मिश्रा हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत तिला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि ती अनसोल्ड राहिली.

लिंसी स्मिथ

लिंसी स्मिथ (Linsey Smith) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) तिला आधारभूत किमतीवर खरेदी करून आपल्या संघात घेतले.

अमांडा जेड वेलिंग्टन

अमांडा जेड वेलिंग्टन (Amanda-Jade Wellington) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. तिला पहिल्यांदा लिलावात खरेदीदार मिळाला नाही.

सायका इशाक

सायका इशाक (Saika Ishaque) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत तिलाही खरेदीदार मिळाला नाही.

अलाना किंग

अलाना किंग (Alana King) हिची आधारभूत किंमत ४० लाख रुपये होती. पहिल्या टप्प्यात तिला कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नाही.

आशा शोभना

आशा शोभना हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. यूपी वॉरियर्सने (UP Warriorz) तिच्यासाठी १.१० कोटी रुपयांची मोठी बोली लावत तिला आपल्या संघात समाविष्ट केले.

वेगवान गोलंदाजांवर मोठी बोली; 'RTM' ने क्रांती गौड यूपीत कायम

लॉरेन बेल

लॉरेन बेल (Lauren Bell) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) तिच्यासाठी मोठी बोली लावत ९० लाख रुपयांमध्ये तिला आपल्या संघात समाविष्ट केले.

डार्सी ब्राउन

डार्सी ब्राउन (Darcie Brown) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत तिला खरेदीदार मिळाला नाही आणि ती अनसोल्ड राहिली.

क्रांती गौड

क्रांती गौड हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने आधारभूत किमतीवर तिच्यामध्ये रस दाखवला. परंतु, यूपी वॉरियर्सने (UP Warriorz) 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर केला. दिल्लीने ५० लाख रुपयांचाच प्रस्ताव दिला, जो यूपीने स्वीकारला. अखेरीस, क्रांती गौड ५० लाख रुपयांमध्ये यूपी वॉरियर्स संघात कायम राहिली.

शबनीम इस्माईल

शबनीम इस्माईल (Shabnim Ismail) हिची आधारभूत किंमत ४० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तिच्यासाठी बोली लावत ६० लाख रुपयांमध्ये तिला विकत घेतले.

लॉरेन चिटेल

लॉरेन चिटेल (Lauren Cheatle) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. तिला पहिल्यांदा लिलावात खरेदीदार मिळाला नाही.

तितास साधू

तितास साधू हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. गुजरात जायंट्सने तिला आधारभूत किमतीवर खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले.

यष्टिरक्षकांच्या लिलावात संमिश्र चित्र

इजी गेज

इजी गेज (Issy Gaze) हिची आधारभूत किंमत ४० लाख रुपये होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत तिला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि ती अनसोल्ड राहिली.

एमी जोन्स

एमी जोन्स (Amy Jones) हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. पहिल्या टप्प्यात तिलाही खरेदीदार मिळाला नाही आणि ती अनसोल्ड राहिली.

लिजेले ली

लिजेले ली (Lizelle Lee) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने तिला आधारभूत किमतीवर विकत घेऊन आपल्या संघात समाविष्ट केले.

उमा छेत्री

उमा छेत्री हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. पहिल्या प्रयत्नात तिलाही कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नाही आणि ती अनसोल्ड राहिली.

कॅप्ड ऑल-राउंडर्स

ग्रेस हॅरिस

ग्रेस हॅरिस ही या यादीतील पहिली खेळाडू ठरली. तिची बेस प्राईज ३० लाख होती. मात्र ती अनसोल्ड राहिली.

चिनेल हेन्री

त्यानंतर वेस्ट इंडिजची चिनेल हेन्री (बेस प्राईज ३० लाख) हिला आरसीबीने पहिली बोली लावली. त्यानंतर डीसीने यात उडी मारली. दरम्यान, बोली १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. UPW ने त्यांचे RTM कार्ड वापरले नाही. अशाप्रकारे, DC ने चिनेल हेन्रीला १.३० कोटींना विकत घेतले.

श्री चरणी बनली कोट्यधीश

श्री चरणीसाठी (बेस प्राईज ३० लाख) UPW ने पहिली बोली लावली. DC फ्रँचायझी देखील त्यात सामील झाली. बोलीने १ कोटींचा टप्पा पार केला. अखेर दिल्ली कॅपिटल्सने १.३० कोटी रुपयांच्या बोलीने श्री चरणीला विकत घेतले.

नादिन डि क्लर्क

नादिन डि क्लर्क (Nadine de Klerk) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) तिच्यासाठी ६५ लाख रुपयांची बोली लावून तिला आपल्या संघात घेतले.

स्नेह राणा

भारतीय अष्टपैलू खेळाडू स्नेह राणा हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने तिला ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

राधा यादव

राधा यादव हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) तिला ६५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

हरलीन देओल

हरलीन देओल हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. यूपी वॉरियर्सने आधारभूत किमतीवर तिला विकत घेतले. मात्र, गुजरात जायंट्सने (Gujarat Giants) 'राईट टू मॅच' कार्डचा वापर केला नाही. यानुसार, हरलीन देओलला यूपी वॉरियर्सने ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

'कॅप्ड' फलंदाजांसाठी लिलावात चुरस

एस. मेघना

एस. मेघना हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. पहिल्या प्रयत्नात तिला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि ती अनसोल्ड राहिली.

भारती फुलमाली

भारती फुलमाली हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तिच्यासाठी ४५ लाख रुपयांची बोली लावली. मात्र, गुजरात जायंट्सने (Gujarat Giants) 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर केला. मुंबईने गुजरातसमोर ७० लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला. गुजरातने हा प्रस्ताव स्वीकारला आणि 'आरटीएम'च्या माध्यमातून ७० लाख रुपयांमध्ये भारतीला संघात घेतले.

तजमिन ब्रिट्ज

तजमिन ब्रिट्ज (Tazmin Brits) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. ती पहिल्यांदा लिलावात उतरल्यावर विकली गेली नाही. ती अनसोल्ड राहिली.

फोएबे लिचफिल्ड

फोएबे लिचफिल्ड (Phoebe Litchfield) हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. यूपी वॉरियर्सने (UP Warriorz) तिच्यासाठी १.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावून तिला आपल्या संघात समाविष्ट केले.

जॉर्जिया वॉल

जॉर्जिया वॉल (Georgia Voll) हिची आधारभूत किंमत ४० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने आधारभूत किमतीवर तिच्यात रस दाखवला. यूपी वॉरियर्सने 'आरटीएम' कार्डचा वापर केला, त्यानंतर आरसीबीने ६० लाख रुपयांचा प्रस्ताव दिला. यूपीने हा प्रस्ताव स्वीकारला नाही आणि आरसीबीने ६० लाख रुपयांमध्ये जॉर्जियाला विकत घेतले.

किरण नवगिरे

भारतीय खेळाडू किरण नवगिरे हिची आधारभूत किंमत ४० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने तिच्यासाठी आधारभूत किमतीवर रस दाखवला. मात्र, यूपी वॉरियर्सने (UP Warriorz) पुन्हा एकदा 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर केला. आरसीबीने यूपीसमोर ६० लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला आणि यूपी वॉरियर्सने तो तात्काळ स्वीकारला. अशा प्रकारे, यूपी वॉरियर्सने 'आरटीएम'च्या माध्यमातून किरण नवगिरेला ६० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवले.

पहिली फेरी संपली

मार्की सेटच्या पहिल्या फेरीत सात खेळाडू विकले गेले. ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिसा हीली अनसोल्ड राहिली.

लॉरा वोलवार्ट

दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा वोलवार्ट (Laura Wolvaardt) हिची आधारभूत किंमत ३० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने तिच्यासाठी बोलीची सुरुवात केली आणि दिल्ली कॅपिटल्सही या शर्यतीत सहभागी झाली. आरसीबीने ९० लाख रुपयांची बोली लावल्यानंतर दिल्ली तात्पुरती बाजूला झाली, पण लगेचच पुन्हा बोलीमध्ये उतरली. अखेरीस, दिल्ली कॅपिटल्सने १.१० कोटी रुपयांमध्ये लॉरा वोलवार्टला विकत घेतले.

मेग लॅनिंग

ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू मेग लॅनिंग (Meg Lanning) हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. तिला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि यूपी वॉरियर्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. यूपीने १.९० कोटी रुपयांची मोठी बोली लावली आणि दिल्लीने माघार घेतली. यानुसार, यूपी वॉरियर्सने लॅनिंगला खरेदी केले.

सोफी एक्लेस्टोन

इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन (Sophie Ecclestone) हिची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एक्लेस्टोनसाठी ८५ लाख रुपयांची बोली लावली. मात्र, यूपी वॉरियर्सने (UP Warriorz) पुन्हा एकदा 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर केला. दिल्लीने यूपीसमोर ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला, जो यूपी वॉरियर्सने स्वीकारला. या पद्धतीने, यूपीने 'आरटीएम'च्या माध्यमातून एक्लेस्टोनला पुन्हा संघात स्थान दिले.

रेणुका सिंग ठाकूर

भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर लिलावासाठी आली, तिची आधारभूत किंमत ४० लाख रुपये होती. रेणुकासाठी बोली लागल्यानंतर गुजरात जायंट्सने तिला ६० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

अमेलिया केर ३ कोटी

दीप्तीनंतर आता अमेलिया केरच्या नावाची लिलावात चर्चा झाली. न्यूझीलंडची ही स्टार अष्टपैलू खेळाडू पूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होती. केरची बोली ५० लाखांवरून ३ कोटी रुपयांपर्यंत वाढली. अखेर मुंबईने अमेलियाला ३ कोटी रुपयांत आपल्या संघाशी जोडले.

दीप्ती शर्माला ३.२ कोटी

यानंतर भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) लिलावात उतरली, जिची बेस प्राईज ५० लाख रुपये होती. दीप्तीसाठी मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती. दिल्ली कॅपिटल्सने तिला तिच्या बेस प्राईजवर घेण्याची इच्छा व्यक्त केली. दीप्तीमध्ये दिल्ली संघाने सुरुवातीला रस दाखवला. मात्र, यानंतर यूपी वॉरियर्सने (UP Warriorz) 'राईट टू मॅच' (Right to Match) कार्डचा वापर केला. दिल्लीने यूपीसमोर दीप्तीला घेण्यासाठी ३.२ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला आणि यूपी वॉरियर्सने दिल्लीचा हा प्रस्ताव स्वीकारला. अशा प्रकारे, यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला ३.२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.

सोफी डिव्हाईनची 2 कोटींमध्ये खरेदी

दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन (Sophie Devine) आली, जिची बेस प्राईज ५० लाख रुपये होती. डिव्हाईनला घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) या संघांनी विशेष रस दाखवला. या दोन्ही फ्रँचायझींमध्ये तिला विकत घेण्यासाठी तीव्र स्पर्धा दिसून आली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सनेही या शर्यतीत सहभाग घेतला. अखेर, गुजरातने दोन कोटी रुपयांची बोली लावली आणि दिल्ली-आरसीबीने माघार घेतली. सोफी डिव्हाईनला गुजरात जायंट्सने दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.

एलिसा हिली अनसोल्ड

सर्वप्रथम, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली लिलावासाठी मैदानात उतरली. तिची बेस प्राईज ५० लाख रुपये होती. मात्र, पहिल्या फेरीत तिला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि ती Unsold खेळाडू ठरली.

महत्त्वाच्या ('मार्की') खेळाडूंची यादी

या लिलावात सहभागी होणाऱ्या महत्त्वाच्या (मार्की) खेळाडूंची आणि त्यांच्या आधारभूत किमतीची (Base Price) यादी खालीलप्रमाणे आहे.

  • सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) : ५० लाख

  • सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) : ५० लाख

  • एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया) : ५० लाख

  • अमेलिया केर (न्यूझीलंड) : ५० लाख

  • मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) : ५० लाख

  • दीप्ती शर्मा (भारत) : ५० लाख

  • रेणुका ठाकूर (भारत) : ४० लाख

  • लॉरा वोलवार्ट (दक्षिण आफ्रिका) : ३० लाख

दीप्ती शर्मा ठरणार लक्षवेधी आकर्षण!

पाच फ्रँचायझींमध्ये एकूण ७३ जागा रिक्त असून, यामध्ये ५० भारतीय खेळाडू आणि २३ परदेशी खेळाडूंसाठी स्थान उपलब्ध आहे. या बहुप्रतिक्षित मेगा लिलावाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारताच्या महिला विश्वचषक विजेत्या संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा असेल. विशेष म्हणजे, दीप्तीला तिच्या पूर्वीच्या उत्तर प्रदेश फ्रँचायझीने करारमुक्त केले आहे.

विश्वचषक स्पर्धेत 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आलेल्या दीप्तीला या हंगामात सर्वात महागडी भारतीय खेळाडू बनण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे विविध फ्रँचायझींमध्ये तिच्यासाठी चुरस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT