त्रिनिदाद आणि टोबॅगोचा खेळाडू केशोर्न वॉलकॉट हा ८८.१६ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह जागतिक विजेता ठरला आहे. त्याने हा विजय त्याच्या अंतिम प्रयत्नापूर्वीच निश्चित केला. २०१२ च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या वॉलकॉटसाठी ही त्याच्या या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स ८७.३८ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदकाचा मानकरी ठरला. अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन याने ८६.६७ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक पटकावले. अमेरिकेच्या ॲथलेटिक्ससाठी हा एक मोठा क्षण असून, त्याने भालाफेकीतील पदकाचा दशकाहून अधिक काळचा दुष्काळ संपवला आहे.
गतविजेता नीरज चोप्रा पाचव्या फेरीनंतर जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीतून बाहेर पडला आणि ८४.०३ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तो त्याच्या चौथ्या थ्रोनंतर आठव्या स्थानावर होता आणि पाचव्या थ्रोला फाउल केल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. भारताचा सचिन यादव ८६.२७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह चौथ्या स्थानावर राहिला आणि पदकापासून थोडक्यात हुकला. पाकिस्तानचा अर्शद नदीम भालाफेक अंतिम फेरीच्या चौथ्या फेरीत ८२.७३ मीटरच्या थ्रोसह स्पर्धेतून बाहेर पडला.
सचिन यादव थ्रो : ८६.२७ मीटर (१), फाउल (२), ८५.७१ मीटर (३), ८४.९० मीटर (४), ८५.९६ मीटर (५), ८०.९५ मीटर (६)
नीरज चोप्राचे थ्रो : ८३.६५ मीटर (१), ८४.०३ मीटर (२), ८३.६५ (३), ८२.८६ (४), फाऊल (५)
ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम आणि रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा या दोघांनीही २०२५ च्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेक अंतिम फेरीत खराब कामगिरी केली, परंतु नीरज अंतिम स्थानाच्या बाबतीत अर्शदपेक्षा पुढे राहिला. नीरजने ८३.६५ मीटर भालाफेक करून टॉप-१० मध्ये स्थान मिळवले होते, परंतु त्यानंतर त्याने ८४.०३ मीटर भालाफेक केली.
त्याचा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाला, तर चौथ्या प्रयत्नात ८२.८६ मीटरचे अंतर कापले. यासह त्याने टॉप-८ मध्ये स्थान मिळवले. तथापि, त्यानंतर तो पाचवा प्रयत्न चुकला. फाऊल केला आणि अंतिम शर्यतीतून बाहेर पडला. नीरजने यापूर्वी २०२३ च्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, परंतु यावेळी तो त्याचे सुवर्णपदक टिकवू शकला नाही.
सचिन यादवला आपल्या कामगिरीत सुधारणा करता आली नाही. त्याने सहाव्या व अंतिम प्रयत्नात ८०.९५ मीटर भालाफेक केली. यासह तो क्रमवारीत चौथ्या स्थानावर राहिला. यासह पदक विजेते निश्चित झाले आहेत, मात्र त्यांचा क्रम अद्याप स्पष्ट झालेला नाही. केशोर्न वॉलकॉट, अँडरसन पीटर्स आणि कर्टिस थॉम्पसन हे तिन्ही खेळाडू पदक मिळवणार आहेत.
ज्युलियन वेबरने अंतिम फेरीत ८६.११ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. पण त्याला पदकाने हुलकावणी दिली.
सचिन यादवचा पाचवा फेक ८५.९६ मीटर राहिला. त्याने सातत्याने ८५ मीटरच्या पुढे भालाफेक केली आहे. आता, पदक जिंकण्यासाठी त्याला आणखी ताकद दाखवावी लागेल. त्याचा अजून एक शेवटचा थ्रो बाकी आहे.
केशॉर्न वॉलकॉट : ८७.८३ मीटर
अँडरसन पीटर्स : ८७.३८ मीटर
कर्टिस थॉम्पसन : ८६.६७ मीटर
सचिन यादव : ८६.२७ मीटर
ज्युलियन वेबर : ८६.११ मीटर
ज्युलियस येगो : ८५.५४ मीटर
रुमेश थरंगा पाथिरेगे : ८४.३८ मीटर
नीरज चोप्रा : ८४.०३ मीटर : बाहेर
डेव्हिड वॅग्नर : ८२.८४ मीटर: बाहेर.
अरशद नदीम : ८२.७३ मीटर: बाहेर.
जेकब वॅडलेज : ७८.७१ मीटर: बाहेर.
कॅमेरॉन मॅकएन्टायर : ७५.६५ मीटर: बाहेर.
नीरज चोप्रा २०२५ च्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर राहिला. तो टॉप-३ मध्ये स्थान मिळवू शकला नाही.
केशॉर्न वॉलकॉट पहिल्या स्थानावर कायम आहे. केशॉर्न वॉलकॉटचा चौथा थ्रो ८८.१६ मीटर राहिला. त्याचे पहिले स्थान जवळजवळ निश्चित झाले. अँडरसन पीटर्स ८७.३८ मीटर थ्रोसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अर्शद नदीम अंतिम फेरीतून बाहेर पडला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८२.७५ मीटर राहिला.
सचिन यादवचा चौथा थ्रो ८४.९० मीटर होता. तो अजूनही चौथ्या स्थानावर आहे. पदक जिंकण्यासाठी त्याला पाचव्या आणि सहाव्या थ्रोमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
नीरज चोप्राचा चौथा थ्रो अपेक्षेप्रमाणे नव्हता. हा थ्रो केवळ ८२.८६ मीटर राहिला. तो सध्या ८ व्या क्रमांकावर आहे.
सर्व १२ खेळाडूंनी प्रत्येकी तीनवेळा भाला फेकला आहे. केशॉर्न वॉलकॉट ८७.८३ मीटर फेकीसह पहिल्या स्थानावर आहे. अँडरसन पीटर्स (८७.३८ मीटर) दुसऱ्या स्थानावर आहे. कर्टिस थॉम्पसन (८६.६७ मीटर) तिसऱ्या स्थानावर आहे.
सचिन यादव अंतिम फेरीत शानदार कामगिरी करत आहे. त्याने आपल्या तिसऱ्या फेकीत ८५.७१ मीटर दूओर भाला फेकला.
कर्टिस थॉम्पसनने त्याचा प्रभावी फॉर्म सुरू ठेवला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८५.३१ मीटरची फेक नोंदवली. तो सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.
नीरज चोप्राचा तिसरा थ्रो फाउल झाला. यासह त्याची आठव्या स्थानावर घसरण झाली.
केशॉर्न वॉलकॉट सध्या चांगली कामगिरी करत आहे. तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ८७.८३ मीटर दूर भाला फेकून पहिले स्थान मिळवले.
अर्शद नदीमने त्याचा दुसरा फाउल केला. तो १० व्या क्रमांकावर आहे.
ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स सध्या २०२५ च्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत नंबर वन आहे. त्याने त्याचा पहिला थ्रो ८७.३८ मीटर आणि दुसरा थ्रो ८७.३८ मीटर राहिला.
नीरज चोप्राचा दुसरा थ्रो ८४.०३ मीटर राहिला. दुसऱ्या थ्रोमध्येही त्याने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याला अंतिम फेरीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
नीरज चोप्राचा पहिल्या थ्रो ने ८३.६५ मीटर अंतर कापले.
अंतिम फेरीत सचिन यादवने त्याच्या पहिल्याच थ्रोमध्ये ८६.२७ मीटर लांब फेकला. त्याला दुसरे स्थान मिळाले.
ज्युलियन वेबरचा पहिला थ्रो ८३.५३ मीटर
१. ज्युलियन वेबर
२. अँडरसन पीटर्स
३. अर्शद नदीम
४. नीरज चोप्रा
५. ज्युलियस युगो
६. कर्टिस थॉम्पसन
७. कॅमेरॉन मॅकसँटीर
८. डेव्हिड वॅग्नर
९. सचिन यादव
१०. रोमेश थरंगा
११. जेकब वॅडलेच
१२. केशॉर्न वॉलकॉट
भारताचा प्रमुख खेळाडू नीरज चोप्रा आहे, पण सचिन यादव देखील अंतिम फेरीत आहे. तथापि, सचिन यादव त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा काही मीटरने पुढे गेल्याशिवाय पदकाच्या शर्यतीत राहणार नाही.
२०२४ नंतर नीरज आणि नदीम पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले आहेत. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकनंतर नीरज चोप्रा पहिल्यांदाच नदीमशी सामना रंगला आहे. नदीमने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ९२.९७ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले, तर टोकियो ऑलिंपिक चॅम्पियन चोप्रा ८९.४५ मीटरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नदीमने यावर्षी फक्त एकच स्पर्धा खेळली. मे महिन्यात कोरियामध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. जुलैमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. बुडापेस्टमध्ये झालेल्या गेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१७ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते, तर नदीम दुसऱ्या आणि वॉलेस तिसऱ्या क्रमांकावर होता.
माजी विश्वविजेता आणि पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता अँडरसन पीटर्सनेही ८९.५३ मीटर दूर भाला फेकून पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर वेबर दुसऱ्या आणि ज्युलियस येगो तिसऱ्या स्थानावर राहिला. नदीमने ८५.२८ मीटर फेकसह पाचवे स्थान पटकावले, तर नीरजने ८४.८५ मीटर लांब भाला फेकला आणि सहावे स्थान पटकावले.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ लध्ये भालाफेक स्पर्धेत बारा खेळाडू पदकासाठी स्पर्धा करत आहेत. भारताकडून नीरज चोप्रा आणि सचिन यादव अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पाकिस्तानचा अर्शद नदीम याचा देखील समावेश आहे. ज्युलियन वेबरचे मजबूत आव्हान आहे.