शुक्रवारी आशिया कप स्पर्धेच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणार आहे.  File Photo
स्पोर्ट्स

Asia Cup T20 IND vs PAK : उद्या रंगणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना! जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Women's Asia Cup 2024 : श्रीलंकेमध्ये आयोजित महिला आशिया चषक 2024 स्पर्धेला शुक्रवारपासून (19 जुलै) सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. हा या स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. सर्व सामने डंबुलामध्ये खेळवले जातील. हा सामना शुक्रवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

4-4 चे दोन गट

महिला आशिया चषक स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 10 दिवस रंगणार आहे. या 8 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, यूएई, मलेशिया आणि थायलँडचा समावेश आहे. स्पर्धेतील 8 संघांना 4-4 च्या दोन गटात विभागण्यात आले आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ आणि यूएई हे संघ ए ग्रुपमध्ये तर यजमान श्रीलंका, बांगलादेश, थायलँड आणि मलेशिया हे संघ बी ग्रुपमध्ये आहेत. स्पर्धेत एकूण 15 सामने होणार आहेत.

भारत गतविजेता

वास्तविक, भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. 2022 च्या हंगामात संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अंतिम अंतिम फेरीत टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. हरमनचा संघ यंदाही विजेतेपदाचा दावेदार आहे. विजेतेपद राखण्यात हा संघ यशस्वी होतो का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

फायनलमध्ये पाकिस्तानचा दोनदा पराभव

पाकिस्तानचे नेतृत्व निदा दार करत आहेत. सध्याच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे गेल्या आशिया चषकात खेळले आहेत. पुरुष संघाप्रमाणेच पाकच्या महिला संघानेही अलीकडच्या काळात कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. यापूर्वी आशिया चषकाच्या फायनलमध्ये त्यांचा भारताने दोनदा पराभव केला आहे.

पाकिस्तान विरुद्ध भारताचे वर्चस्व

टी-20 विश्वचषक (2009; टाँटन, इंग्लंड) च्या उद्घाटन स्पर्धेदरम्यान खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान महिला प्रथमच आमनेसामने आले. भारताने हा सामना 15 धावांनी जिंकला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 14 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत भारताने 11 सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला आहे, तर पाकच्या महिला संघाला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत.

टीम इंडियाचे वेळापत्रक

पहिला सामना : 19 जुलै : भारत विरुद्ध पाकिस्तान, डंबुला, संध्याकाळी ७ वा.

दुसरा सामना : 21 जुलै : भारत विरुद्ध युएई, डंबुला, दुपारी 2 वा.

तिसरा सामना : 23 जुलै : भारत विरुद्ध नेपाळ, डंबुला, संध्याकाळी 7 वा.

सर्व संघ

अ गट : भारत, पाकिस्तान, नेपाळ, यूएई

ब गट : श्रीलंका, थायलंड, मलेशिया, बांगलादेश

भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजाना संजीवन.

पाकिस्तान महिला संघ

निदा डार (कर्णधार), आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजीहा अल्वी, नाशरा संधू, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT