पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup Semi Final Scenario : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या गट 2 चे सुपर 8 सामने संपले आहेत. गट 2 मधून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. ते उपांत्य फेरीत कोणत्या संघांना भिडणार याची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण समीकरणाबद्दल जाणून घेऊया.
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीसाठी दोन संघ निश्चित झाले आहेत.
द. आफ्रिका आणि इंग्लंड या दोन संघांनी आपले स्थान पक्के केले आहे.
सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये द. आफ्रिका पहिल्या, तर इंग्लंड 2-या स्थानी आहे.
गट 1 मध्ये भारत टॉपवर राहिल्यास त्यांची लढत इंग्लंडशी होईल.
दक्षिण आफ्रिकेच्या सुपर 8 फेरीच्या गट 2 मशील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे हा संघा गटात अव्वल ठरला आहे. अशा स्थितीत त्यांचा उपांत्य फेरीत गट 1 मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी सामना होईल. दुसरीकडे, इंग्लंडने सुपर 8 फेरीत एक सामना गमावला पण त्यांनी दोन सामने जिंकून गट 2 मध्ये दुसरे स्थान मिळले आहे. त्यामुळे त्यांची लढत गट 1 मधील अव्वल स्थानी असणा-या संघाशी होईल. मात्र, ग्रुप 1 मधील भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे दोन संघ कोणत्या स्थानावर उपांत्य फेरीत पोहोचतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर तो गट 1 मधील टेबल टॉपर म्हणून उपांत्य फेरी गाठेल आणि उपांत्य फेरीत रोहित सेनेचा सामना इंग्लंडशी सामना करावा लागेल. दुसरीकडे जर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि त्यानंतर अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला, तर गट 1 मधील तिन्ही संघांचे गुण 4-4 होतील. अशावेळी उपांत्य फेरी गाठणारे पहिले दोन संघ कोण असतील हे निव्वळ धावगतीच्या आधारावर ठरवले जाईल.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले तर भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र, नेट रन रेटच्या आधारेच गट 1 मध्ये कोण प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवेल हे निश्चित होईल.
जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला आणि अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला पराभूत केले तर भारत आणि अफगाणिस्तान अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
टी-20 वर्ल्ड कपचा पहिला उपांत्य सामना 27 जून रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू होईल. तर विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना त्याच दिवशी रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे.