Khushi Mukherjee Suryakumar Yadav Pudhari
स्पोर्ट्स

Khushi Mukherjee: क्रिकेट विश्वात खळबळ! सूर्यकुमार यादवबाबत अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य; 'मला तो मेसेज करत होता…'

Who is Khushi Mukherjee: अभिनेत्री खुशी मुखर्जी हिने क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवबाबत अजब दावा केला आहे. तो मला मेसेज करत होता, मात्र आता दोघांमध्ये कोणताही संवाद नसल्याचं तिने सांगितलं. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Khushi Mukherjee Suryakumar Yadav Claim: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत अभिनेत्री खुशी मुखर्जीने केलेल्या दाव्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. खुशी मुखर्जीने असा दावा केला आहे की, सूर्यकुमार यादव तिला पूर्वी मेसेज करत होता, मात्र आता दोघांमध्ये कोणताही संवाद नाही. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

खुशी मुखर्जी ही तिच्या बोल्ड ड्रेसिंग स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिच्या मागे अनेक क्रिकेटर होते आणि तिचं नाव अनेकदा प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं. मात्र तिला अशा कोणत्याही ‘लिंकअप’मध्ये रस नसल्याचं तिने सांगितलं.

एका मुलाखतीदरम्यान खुशी म्हणाली, “अनेक क्रिकेटर माझ्याशी संपर्कात होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता आमच्यात फारसं बोलणं होत नाही. मला कोणाशीही नाव जोडून घ्यायचं नाही.” तिच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

याआधीही खुशी मुखर्जी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. तिने असा आरोप केला होता की, तिच्या काही जवळच्या मित्रांनी तिला नशा देऊन तिच्या घरातून दागिने चोरले. या दागिन्यांची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचं तिने सांगितलं. “जेव्हा मित्रच शत्रू बनतात, तेव्हा विश्वास कोणावर ठेवायचा हेच कळत नाही.,” असंही तिने भावनिक होत सांगितलं होतं.

खुशी मुखर्जी कोण आहे?

खुशी मुखर्जीचा जन्म कोलकात्यात झाला असून ती सध्या 29 वर्षांची आहे. 2013 मध्ये तिने तमिळ चित्रपट ‘अंजल थुरई’ मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने तेलुगू आणि हिंदी चित्रपटांतही काम केलं. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती टेलिव्हिजन आणि रिअ‍ॅलिटी शोमधून. एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला 10’ आणि ‘लव्ह स्कूल 3’ या कार्यक्रमांमुळे ती घराघरात पोहोचली.

एकंदरीत, सूर्यकुमार यादववर केलेल्या दाव्यांमुळे खुशी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र या दाव्यांवर सूर्यकुमार यादवने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT