हिमानी मोर हिने भारताचा स्टार भालाफेकपटू निरज चोप्रा याच्याशी लग्न केले आहे. Pudhari Photo
स्पोर्ट्स

हिमानी मोर कोण आहे? जी बनली नीरज चोप्राची जीवनसाथी

Who Is Himani Mor | नीरज चोप्रा आणि हिमानी मोर हे विवाह बंधनात अडकले आहेत

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा रविवारी (दि.19) विवाहबद्ध झाला. नीरजने हिमानी मोरसोबत (Who Is Himani Mor) लग्न केले आहे. नीरजच्या लग्नाला त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे नातेवाईकही उपस्थित होते. त्याने गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. नीरजने सोशल मीडिया पोस्टद्वारे लग्नाची माहिती दिली. त्याने तीन फोटो शेअर केले आहेत. जरी नीरजने कधीही हिमानीचा उल्लेख केला नाही, तरी लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की ती भाग्यवान मुलगी कोण आहे. जिने नीरज चोप्रासारख्या स्टार खेळाडूला आपला जीवनसाथी बनवले. चला जाणून घेऊया...

स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या माहितीनुसार, हिमानी मोर ही एक राष्ट्रीय पातळीवरची टेनिसपटू आहे. तिने साउथईस्टर्न लुईझियाना विद्यापीठातून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती फ्रँकलिन प्रायर्स विद्यापीठात अर्धवेळ स्वयंसेवक सहाय्यक टेनिस प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. अमहर्स्ट कॉलेजमध्ये पदवीधर सहाय्यक म्हणून काम करणारी हिमानी कॉलेजच्या महिला टेनिस संघाचे व्यवस्थापन करते. ती संघाचे प्रशिक्षण, वेळापत्रक, भरती आणि बजेट यावर देखरेख करते. हिमानी मॅककॉर्मॅक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

Who Is Himani Mor |  हिमानीने सोनीपतमधील लिटिल एंजेल स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

हिमानी मोर ही हरियाणातील लार्सौलीची रहिवासी आहे. तिने सोनीपतमधील लिटिल एंजेल शाळेतून शिक्षण घेतले जिथे भारतीय टेनिसपटू सुमित नागलने शिक्षण घेतले. तिचा भाऊ हिमांशू देखील टेनिस खेळतो. नीरज चोप्रा हा स्वतंत्र भारतातील पहिला खेळाडू आहे ज्याने ऑलिंपिकमध्ये भारतासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

Who Is Himani Mor |  नीरजने सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती

नीरजने सोशल मीडियावर लिहिले की, 'माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहे. या क्षणी आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल आभारी आहे. नीरज सध्या नवीन हंगामापासून ब्रेक घेत आहे. नीरज पहिल्यांदा 2016 मध्ये २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT