India Vs West Indies T20I Cricket Record: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा १४ धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारतने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मात्र जरी वेस्ट इंडीजने हा सामना गमावला असला तरी वेस्ट इंडीजने एक असा विक्रम केला आहे जो विक्रम आजपर्यंत कोणत्याही जागतिक क्रिकेट संघाला करता आलेला नाही.
वेस्ट इंडीजने रविवारच्या टी २० सामन्यात आपले २००० षटकार पूर्ण केले. भारताविरूद्धच्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भारताविरूद्ध १३ षटकार ठोकले. या सामन्यापूर्वी वेस्ट इंडीजच्या नावावर १९९७ षटकार होते. त्यामुळं २००० षटकांचा विक्रम करण्यासाठी त्यांना फक्त ३ षटकारांची गरज होती. वेस्ट इंडीजने भारताचे टार्गेट चेस करताना आक्रमक सुरूवात केली होती. त्यानंतरच त्यांनी क्रिकेट इतिहासातील एक खास विक्रम केला.
टी २० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज आक्रमक अंदाजात खेळते. त्यामुळेच ते २००० षटकारांचा विक्रम करू शकले आहेत. मात्र या हाणामारीच्या स्टाईलमध्ये भारत देखील कमी नाहीये. त्याने देखील टी २० क्रिकेटमध्ये १९९७ षकार मारले आहेत. न्यूझीलंड या यादीत १५८५ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेचा नंबर लागतो.
2010- वेस्टइंडीज
1997- भारत
1585- न्यूजीलँड
1500- पाकिस्तान
1407- द. अफ्रिका
1406- इंग्लँड
1400- ऑस्ट्रेलिया
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २२३ धावा केल्या होत्या. अभिषेक शर्माने ३० चेंडूत ६९ धावांची खेळी केली. तर इशान किशनने १८ चेंडूत ३७ धावा चोपल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी रचली होती.
२२४ धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडीजला २० षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडीजकडून शिमरॉन हेटमायर आणि कामिल पूरनने धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. हेटमायरने २६ चेंडूत ४३ धावा केल्यात तर पूरनने २७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली.
मात्र भारतीय गोलंदाजांनी दबावाच्या क्षणी चांगला मारा करत वेस्ट इंडीजला २०९ धावात रोखले. अर्शदीप सिंहने ४४ धावांमध्ये ३ विकेट्स घेतल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.