Doping test case | धावपटू व्ही. के. विस्मया, श्रीनिवासवर बंदीची कुर्‍हाड 
स्पोर्ट्स

Doping test case | धावपटू व्ही. के. विस्मया, श्रीनिवासवर बंदीची कुर्‍हाड

उत्तेजक द्रव चाचणीप्रकरणी ‘नाडा’ची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या व्ही. के. विस्मयावर दोन वर्षांची, तर धावपटू एन. षण्मुगा श्रीनिवासवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने प्रतिबंधित अमली पदार्थांचे सेवन आणि चाचणीत अडथळा आणल्याप्रकरणी हे कठोर पाऊल उचलले.

2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या विस्मयाच्या लघवीच्या नमुन्यात ‘क्लोमिफेन’ हे प्रतिबंधित द्रव आढळले होते. कोची येथील तिच्या राहत्या घरी 15 ऑगस्ट 2024 रोजी ही चाचणी घेण्यात आली होती. विस्मयाने हे औषध वंध्यत्वावरील उपचारासाठी घेतल्याचा दावा केला होता. मात्र, समितीने तो फेटाळून लावत तिला दोषी ठरवले. ही बंदी 29 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे.

दुसरीकडे, धावपटू षण्मुगा श्रीनिवासवर नमुना देण्यास नकार देणे आणि टाळाटाळ केल्याप्रकरणी 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हैदराबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रावर उत्तेजक चाचणी चुकवण्यासाठी माजी कनिष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक एन. रमेश यांनी मदत केल्याचा आरोपही समोर आला आहे. ही बंदी 6 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT