सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली  (संग्रहित छायाचित्र)
स्पोर्ट्स

कोहलीकडे वनडे मालिकेत तेंडुलकरला मागे टाकण्याची मोठी संधी! ‘इतक्या’ धावांची गरज

Kohli vs Tendulkar : वनडे क्रिकेटमध्ये 13000 पेक्षा जास्त धावा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli vs Sachin Tendulkar : विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोहलीची भारतीय संघात निवड झाली आहे. तो भारतीय फलंदाजीचा मजबूत कणा मानला जातो. आता एकदिवसीय मालिकेत, कोहलीला त्याच्या विक्रमांच्या मुकुटात आणखी एक रत्न जोडण्याची संधी आहे.

कोहली सचिनला मागे टाकणार?

विराट कोहलीने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 36 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 1340 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. तो इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर 1455 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता जर कोहलीने एकदिवसीय मालिकेत आणखी 116 धावा केल्या तर तो सचिनला मागे टाकून इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनेल.

इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

महेंद्रसिंग धोनी - 1546 धावा

युवराज सिंग - 1523 धावा

सचिन तेंडुलकर - 1455 धावा

विराट कोहली - 1340 धावा

सुरेश रैना - 1207 धावा

वनडे क्रिकेटमध्ये 13000 पेक्षा जास्त धावा

विराट कोहलीने भारतीय संघासाठी 2011 चा एकदिवसीय विश्वचषक, 2013 चा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्याने 2008 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, त्याने आपल्या दमदार खेळाने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 13906 धावा केल्या आहेत, ज्यात 50 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT