Virat Kohli Pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli: 40 हजारांचा स्मार्ट TV आणि महागडा फोन... RCB जिंकल्यानंतर विराट कोहलीला काय काय मिळालं?

Virat Kohli Gifts RCB Win: विराट कोहलीने गुजरातविरुद्ध 81 धावांची शानदार खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला विजय मिळवून दिला.

पुढारी वृत्तसेवा

Virat Kohli Gifts RCB Win: विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या दमदार फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने गुजरात टायटन्स विरुद्ध शानदार विजय मिळवला आणि या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला विराट कोहली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे बेंगळुरूचा IPL 2026 मध्ये पाचवा विजय झाला.

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने फक्त 44 चेंडूत 81 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत आकर्षक चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या शानदार प्रदर्शनासाठी त्याला “प्लेयर ऑफ द मॅच” पुरस्काराने गौरवण्यात आले.

मात्र, कोहलीसाठी सरप्राईज इथेच संपले नाही. सामन्यानंतर RCB च्या ड्रेसिंग रूममध्ये त्याला आणखी खास गिफ्ट्स देण्यात आले. टीमच्या स्पॉन्सर्सकडून कोहलीला एक महागडा स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहलीला देण्यात आलेला LED स्मार्ट टीव्ही 43 इंचाचा असून त्याची किंमत सुमारे 40 हजार रुपये आहे. याशिवाय त्याला एक प्रीमियम स्मार्टफोनही भेट देण्यात आला, ज्याची किंमत जवळपास 45 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

कोहलीची ही खेळी आणखी खास ठरली कारण IPL 2026 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवरील RCB चा हा शेवटचा लीग सामना होता. आपल्या अर्धशतकाच्या जोरावर विराटने या हंगामात 328 धावा पूर्ण करत काही काळासाठी ऑरेंज कॅपवरही कब्जा केला.

विराट कोहलीचा फॉर्म आणि त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता RCB चाहत्यांमध्ये आता संघाकडून ट्रॉफी जिंकण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT