पुढारी ऑनलाईन डेस्क : Vinod Kambli Health Update : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्येने त्रस्त असलेल्या कांबळी यांची शनिवारी रात्री उशिरा प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळी यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.