Vinesh Phogat : विनेश...तुम्ही हार न माणनाऱ्या : राहुल गांधी  pudhari photo
स्पोर्ट्स

Vinesh Phogat : विनेश...तुम्ही हार न माणनाऱ्या : राहुल गांधी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Indian Wrestler Vinesh Phogat) हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे,  " भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल." 

संपुर्ण देश तुमच्या पाठीशी : राहूल गांधी

कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, 

"विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हार न मानणाही आहे, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश तुमची ताकद बनून तुमच्या पाठीशी उभा आहे."

अंतिम सामन्यासाठी अपात्र

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Indian Wrestler Vinesh Phogat) हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. भारतीय संघाने महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविल्याची माहिती दिली आहे. २९ वर्षीय फोगाट हिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. कारण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन १५० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. भारतीय संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही आज सकाळी फोगाट यांचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. (Vinesh Phogat Disqualified) 

विनेश फोगाटची प्रकृती अचानक बिघडली 

दरम्यान विनेश फोगाटची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्‍यामुळे तीला तात्‍काळ रूग्‍णालयात भरती करण्यात आले आहे. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र ठरल्‍याची बातमी आल्‍यानंतर ही दुसरी बातमी समाेर आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT