Vaibhav Suryavanshi Team India Selection: झिम्बाब्वे येथे झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. या विजयात भारताच्या १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने सिंहाचा वाटा उचलला. त्याने ८० चेंडूत १७५ धावा ठोकत भारताला ४११ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. त्यानं आपल्या खेळीत १५ षटकार आणि १५ चौका रमारले होते. यामुळं सामना एकतर्फी झाला.
बिहारच्या १४ वर्षाच्या वैभवने इंग्लंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यानं आयपीएलमध्ये देखील आपला जलवा दाखवला होता. त्यामुळं आता या १४ वर्षाच्या वैभवला भारतीय संघात का संधी दिली जात नाही असा प्रश्न चाहते विचारत आहेत. मात्र बीसीसीआय आताच वैभवला भारतीय संघात स्थान देऊ शकत नाही. बीसीसीआयला त्याच्या कामगिरीवर आणि क्षमतेवर विश्वास नाही असं नाही तर आयसीसीचा एक नियम वैभवच्या टीम इंडियामधील समावेशात खोडा घालत आहे.
वैभव सूर्यवंशीने जरी मोठमोठ्या खेळ्या अन् अनेक विक्रम आपल्या पयदाळी तुडवले असले तरी आयसीसीचा किमान वयाचा नियमामुळं त्याला टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवता येत नाहीये. आयसीसीने २०२० मध्ये हा नियम लागू केला आहे. त्यानुसार कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे किमान वय १५ वर्षे असलं पाहिजे. आयसीसीने हा नियम खेळाडूच्या शारीरिक आणि मानसिक सुरक्षेसाठी तयार केला आहे.
वैभवचा जन्म हा २७ मार्च २०११ रोजी झाला असून फेब्रुवारी २०२६ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला त्यावेळी त्याचे वय १४ वर्षेच आहे. त्यामुळं जरी वैभवनं ३६ चेंडूत शतक ठोकलं असलं किंवा IPL मध्ये आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या असल्या तरी भारतीय वरिष्ठ संघात त्याची निवड ही २७ मार्च २०२६ पूर्वी शक्य नाही.
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी वरिष्ठ संघासाठी अजून लहान आहे. मात्र आता वैभव १९ वर्षाखालील संघाकडून देखील पुन्हा खेळू शकणार नाही.
बीसीसीआयचा एक कडक नियम आहे. या नियमानुसार खेळाडूला फक्त एकदाच १९ वर्षाचा वर्ल्डकप खेळता येऊ शकतो. हा नियम नव्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी करण्यात आला आहे.
अंडर-१९ वर्ल्डकप फायनल (२०२६): इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात केवळ ८० चेंडूत १७५ धावांची वादळी खेळी. हे अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमधील आतापर्यंतचे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
वर्ल्डकपमध्ये षटकारांचा पाऊस: २०२६ च्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये एकूण ३० षटकार ठोकून त्याने एकाच स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विश्वविक्रम केला.
सर्वात तरुण शतकवीर (List-A): अवघ्या १४ वर्षे २७२ दिवस वयात 'लिस्ट-ए' क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
एबी डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड मोडला: विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ ५९ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या (६४ चेंडू) नावे होता.
IPL मध्ये इतिहास: आयपीएल २०२५ मध्ये केवळ ३५ चेंडूत शतक झळकावून तो आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयाचा आणि सर्वात वेगवान भारतीय शतकवीर ठरला.
भारत-A साठी विक्रम: भारत-A संघासाठी टी-२० मध्ये शतक झळकावणारा तो पहिला आणि सर्वात तरुण खेळाडू आहे.
सर्वात वेगवान युथ ODI शतक: इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध फक्त ५२ चेंडूत शतक ठोकून त्याने युथ वन-डे क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावे केला.
युथ टेस्टमध्येही दबदबा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युथ टेस्टमध्ये अवघ्या ५८ चेंडूत शतक झळकावले, जे भारतीय खेळाडूसाठी सर्वात वेगवान आहे.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT): महाराष्ट्राविरुद्ध खेळताना नाबाद १०८ धावा केल्या आणि या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान मिळवला.