Vaibhav Sooryavanshi Debut: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी २० मालिकेचा पहिला सामना आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. हा सामना बेलफास्टच्या सिविल सर्विस क्रिकेट क्लबमध्ये होत आहे. याच सामन्यातून भारताचा १५ वर्षाचा धाडाकेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी आपलं आंतरराष्ट्री पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याला पहिल्याच सामन्यात प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या या पदार्पणावर वरून आडकाठी येण्याची शक्यता आहे. या सामन्यावर पावसाचे ढग दाटले असून वैभवचे पदार्पणावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
बीबीसी वेदरच्या अंदाजानुसार शुक्रवारी पूर्ण दिवस बेलफास्टमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच थांबून थांबून पावसाची देखील शक्यता आहे. सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता ही ३० ते ४३ टक्के इतकी सांगितली जात आहे. या दिवशी तापमान हे २२ ते २३ डिग्री असण्याची शक्यता आहे. या दिवसी सामना होण्याची शक्यता आहे मात्र थांबून थांबून पाऊस मोठी अडचण निर्माण करू शकतो.
सध्या हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार मोठा पाऊस नसला तरी दिवसभर ड्राय स्पेल देखील राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण सामना रद्द होण्याची शक्यता नाही. मात्र पाऊस व्यत्यय आणू शकतो.
गेल्या काही दिवसांपासून बेलफास्टचे वातावरण सतत बदल आहे. त्यामुळं अचूक हवामान अंदाज देणं कठिण आहे. या दिवशी वेगवान वाऱ्याची शक्यता नाही. त्या सामन्यात जर वैभवला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर तो इतिहास रचू शकतो. मात्र त्याचा हा ऐतिहासिक सामना हा पावसावर अवलंबून आहे.
जर वैभव सूर्यवंशीचा समावेश प्लेईंग ११ मध्ये झाला तर तो भारताकडून पुरूष आणि महिला संघाचे मिळून सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू ठरणार आहे. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर आता संपूर्ण क्रिकेट जगत त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाकडे डोळे लावून बसले आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी २० सामना हा शुक्रवारी २६ जून रोजी बेलफास्ट इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक ही ५.३० मिनिटांनी होणार असून या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे सोनी लीव्ह अॅप आणि वेबसाईटवर पाहता येईल.