Vaibhav Sooryavanshi 16 ball fifty UAE : टीम इंडिया युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात अत्यंत आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आजच्या सामन्यात त्याने केवळ १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आपल्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि अवघ्या तीन षटकांच्या आत ८ षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. यानंतर पुढील १२ चेंडूत त्याने शतकही पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने जागतिक विक्रम मोडित काढला असून, लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
'रायझिंग स्टार्स आशिया कप'मध्ये १५ वर्षीय सूर्यवंशीची कामगिरी सुरुवातीला फारशी चांगली नव्हती; नेपाळ आणि पाकिस्तान 'अ' विरुद्धच्या सामन्यांत तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. मात्र, संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात त्याने पूर्णपणे वेगळ्या लयीत फलंदाजी केली आणि दोहाच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला.
डावखुऱ्या सूर्यवंशीने पहिल्याच षटकात सलग तीन षटकार (हॅट्ट्रिक) ठोकले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या षटकात त्याने एक चौकार आणि आणखी दोन षटकार मारले. तिसऱ्या षटकात त्याने पुन्हा तीन षटकार लगावत अवघ्या १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, या युवा खेळाडूने एकूण ८ षटकार मारत संयुक्त अरब अमिरातीच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही.
आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आपल्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि अवघ्या तीन षटकांच्या आत ८ षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. यानंतर पुढील १२ चेंडूत त्याने शतकही पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने २८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. 'लिस्ट ए' (List A) क्रिकेटमधील हे सर्वात जलद शतक आहे. वैभवने मॅकगर्कचा विक्रम मोडला, ज्याने २९ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.