US Open 2025 | शेल्टन दुखापतीमुळे बाहेर; जोकोव्हिचचा विक्रम File Photo
स्पोर्ट्स

US Open 2025 | शेल्टन दुखापतीमुळे बाहेर; जोकोव्हिचचा विक्रम

यूएस ओपन टेनिस स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : यूएस ओपनमध्ये युवा अमेरिकन स्टार बेन शेल्टनला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, तर दुसरीकडे 38 वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचने विक्रमांची नोंद करत चौथी फेरी गाठली. त्याच्यापाठोपाठ अमेरिकेच्याच फ्रान्सिस टियाफो आणि एम्मा नवारो यांनाही पराभवाचा धक्का बसला.

जोकोव्हिचचा ऐतिहासिक विक्रम

एका बाजूला युवा खेळाडू संघर्ष करत असताना, आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर विक्रमवीर नोव्हाक जोकोव्हिचने आपली घोडदौड कायम ठेवली. त्याने कॅमेरॉन नॉरीचा 6-4, 6-7 (4), 6-2, 6-3 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. या विजयासह तो 1991 मध्ये जिमी कॉनर्सनंतर यूएस ओपनच्या शेवटच्या 16 मध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. इतकेच नाही, तर रॉजर फेडररला मागे टाकत ग्रँड स्लॅममध्ये हार्ड कोर्टवर सर्वाधिक (192) विजय मिळवण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला.

दरम्यान, अन्य लढतीत विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझने इटलीच्या लुसियानो डार्डेरीचा 6-2, 6-4, 6-0 असा पराभव केला. महिला एकेरीतील विद्यमान विजेती आर्यना सबालेन्काने कॅनडाच्या लेला फर्नांडिझला 6-3, 7-6(2) असे पराभूत केले.

भारतीय जोडीची घोडदौड

भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर आणि विजय प्रशांत या दुहेरी जोडीने अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि इव्हान किंग या जोडीचा पराभव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT