स्पोर्ट्स

UEFA Champions League Final : रिअल माद्रिदने विक्रमी 15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली! डॉर्टमंडवर 2-0 ने मात

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : UEFA Champions League Final : स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदने 15व्यांदा युरोपियन फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा UEFA चॅम्पियन्स लीग (UCL) जिंकली. शनिवारी रात्री उशिरा लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर या संघाने जर्मन क्लब बोरुसिया डॉर्टमंडचा 2-0 असा पराभव केला. रिअल माद्रिदसाठी डॅनी कार्वाजलने 73व्या मिनिटाला आणि व्हिनिसियस ज्युनियरने 84व्या मिनिटाला गोल केले.

पूर्वार्धात डॉर्टमंड वरचष्मा

पहिल्या हाफमध्ये डॉर्टमंडचा वरचष्मा राहिला. जणू काही उलटफेर होईल असे वाटत होते. आक्रमक खेळ करून त्यांनी आठवेळा गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण त्यांना अपयश आले. सामन्याच्या 23व्या मिनिटाला डॉर्टमंडच्या निकलास फुलक्रुगने फटकावलेला चेंडू गोल पोस्टवर आदळला. यादरम्यान, रिअल माद्रिदला बचावात्मक खेळावर भर द्यावा लागला. त्यामुळे सामन्याच्या पूर्वार्धात त्यांना केवळ दोनच शॉट्स लक्ष्यापर्यंत मारता आले. (UEFA Champions League Final)

दुस-या हाफमध्ये माद्रिदचे वर्चस्व

पहिला हाफ गोलशून्यने संपल्यानंतर रिअल माद्रिदने उत्तरार्धात व्यूहरचना बदलली आणि आक्रमण तीव्र केले. पण डॉर्टमंडने त्यांच्या बचावात कोणतीही चूक केली नाही. सामन्याचा दुसरा हाफ देखील गोलशून्य बरोबरीत संपुष्टात येईल असे दिसत होते.

सामन्याच्या 83व्या मिनिटाला माद्रिदच्या विनिशियस ज्युनियरने चेंडूवर ताबा मिळवला. चपळाई दाखवत त्याने डाव्या बाजूने डॉर्टमंडच्या डी पर्यंत धडक मारली आणि डॉर्टमंड गोलरक्षक कोबेलला चकवा देत संघाची आघाडी दुप्पेट केली. 90 मिनिटांनंतर 5 मिनिटांचा इंज्युरी टाईम देण्यात आला. मात्र डॉर्टमंडच्या खेळाडूंना या संधीचा फायदा घेता आला नाही. अशाप्रकारे रिअल माद्रिदने 2-0 असा विजय मिळवला आणि विक्रमी 15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. (UEFA Champions League Final)

SCROLL FOR NEXT