पुढारी ऑनलाईन डेस्क
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर देशभरातील शेतकऱ्यांकडून गेल्या ७१ दिवसांपासून एल्गार सुरु आहे. या आंदोलनावरून गेल्या ७१ दिवसांपासून मूग गिळून गप्प बसलेल्या बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून काल एकाचवेळी एकाच भाषेत ट्विट करत देशाच्या सार्वभौमत्वावर तडजोड करू शकत नाही असे ट्विट केली गेली. याला सुरुवातही अर्थातच ट्विटमुळेच झाली. (twitter abuzz after notable Indian cricketers including Sachin Tendulkar Virat Kohli tweet on farmers protest)
अधिक वाचा : गाझीपूर सीमेवरचे 'लोखंडी खिळे' पोलिसांनी काढले!
अमेरिकन पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि माजी पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनात सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही आणि मुस्कटदाबीच्या विरोधात ट्विट करून पाठिंबा देत आंतरराष्ट्रीय समूदायाचे लक्ष वेधले. यामुळे केंद्र सरकारचा संताप अनावर झाला. त्यानंतर बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी ट्विट केली. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचाही समावेश होता.
अधिक वाचा : देशी-विदेशी सेलिब्रिटी आंदोलनावरून भिडले
सचिनने आजवर कोणतीही सामाजिक आणि राजकीय भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे त्याने केलेल्या ट्विटने सर्वांधिक धुलाई सोशल मीडियातून त्याची झाली आहे. त्याने केलेल्या ट्विटवर ४९ हजार ५०० कमेंटचा पाऊस पडला आहे. या कमेंटमध्ये त्याचे क्रिकेटमधील देवपण बाजूला ठेवून सोशल मीडियातून कडाडून प्रहार केला आहे. किंबहुना त्याच्या ट्विटला देशभरातील नेटकऱ्यांनी अप्पर कट करून बाजूला केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अधिक वाचा : मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
कणाहीन, स्वार्थी, आदर गमावला, समर्थन करता येत नाही, तर बचाव तरी कशाला करता यापासून पोरग्याचं (अर्जुन तेंडुलकर) करियर सुरु व्हायचं आहे म्हणूनच सचिन बोलला अशा शेलक्या भाषेत सचिनचा समाचार घेण्यात आला आहे. सचिनने आजवर केलेल्या ट्विटवर कधीच एवढ्या कमेंट आल्या नव्हत्या तेवढ्या एका ट्विटवर आल्या आहेत. आज शाहीद आफ्रिदीला सचिनने मागे टाकले अशीही प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
अधिक वाचा : शेतकरी आंदोलकांसोबत उभी राहणारी अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिच्याबद्दल जाणून घ्या…
सचिनने आंतराष्ट्रीय कारकिर्दीत जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या प्रतिक्रिया त्याच्या एका ट्विटने आल्या आहेत. सचिनने खासदार असता तर आणि अशी काही भूमिका घेतली असती तर बर झालं असतं, अशीही काहींनी प्रतिक्रिया दिली आहे.
अधिक वाचा : #Dhoni ट्रेंडवर, काय आहे कारण?
अधिक वाचा : 'भारतासाठीचा निर्णय भारतीयांनीच घ्यायला हवा'