स्पोर्ट्स

Toni Kroos Retirement : ‘जर्मन स्नायपर’ टोनी क्रुसची निवृत्तीची घोषणा! युरो कपनंतर करणार फुटबॉलला अलविदा

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क | Toni Kroos Retirement : जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू टोनी क्रूझ 2024 च्या युरोपियन चॅम्पियनशिप म्हणजेच युरो कप 2024 नंतर फुटबॉलमधून निवृत्त होणार आहे. तो खेळत असलेला स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदने मंगळवारी (दि.20) ही माहिती दिली. रिअल माद्रिदने सांगितले की, 34 वर्षीय क्रुझने युरो 2024 नंतर व्यावसायिक फुटबॉल संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, टोनी क्रूझ निवृत्तीची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2021 मध्येही त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला होता. मात्र, काही महिन्यांनंतर त्याने आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पुनरागमन केले.

रिअल मद्रिदने व्यक्त केली भावना

रिअल माद्रिदने दिलेल्या माहितीनुसार, 'क्लब टोनी क्रुसबद्दल कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करू इच्छितो. तो आमच्या क्लबच्या महान खेळाडूंपैकी एक म्हणून मानला जाईल. क्रुझ 2014 पासून रिअल माद्रिदकडून खेळत आहे. या कालावधीत त्यांच्या संघाने 22 विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये चार युरोपियन कप आणि चार स्पॅनिश लीगचा समावेश आहे. त्याने क्लबसोबत 463 सामने खेळले आहेत. निवृत्तीपूर्वी त्याला रिअल माद्रिदसह पाचव्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्याचीही संधी आहे. यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत रिअल माद्रिदचा सामना बोरुसिया डॉर्टमंडशी होणार आहे. हा सामना 1 जून रोजी इंग्लंडच्या वेम्बली येथे होणार आहे.

2018 सालच्या वर्ल्ड कपमध्ये क्रुस अपयशी

क्रुसने जर्मनीसाठी 108 सामन्यांत 17 गोल नोंदवले आहेत. क्रुस हा 2014 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीचा प्रमुख खेळाडू होता. जर्मनीने उपांत्य फेरीत ब्राझीलचा 7-1 गोल फरकाने पराभव केला होता. या सामन्यात क्रुसने दोन गोल केले होते. या स्पर्धेचे विजतेपद जर्मनीने पटकावले होते. यानंतर 2018 साली रशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनी संघाची धुरा टोनीकडे होती. या स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करण्यात तो अपयशी ठरला होता.

युरो कपमध्ये करणार जर्मनीचे नेतृत्व

क्रुझ 2024च्या युरो कपमध्ये जर्मनीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. क्रुस इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाला, नेहमीच मला माझ्या कामगिरीच्या शिखरावर असताना कारकिर्दीचा शेवट करण्याची होती. मला आनंद आणि अभिमान आहे की, माझ्या निर्णयासाठी योग्य वेळ सापडली आहे.

10 वर्ष रिअल मद्रिदकडून खेळला क्रुस

2014 साली रिअल मद्रिने टोनी क्रुसला आपल्या संघात दाखल करून घेतले होते. रिअल मद्रिदकडून खेळताना त्याने अनेक जेतेपद पटकावले आहेत. मद्रिदच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 22 विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये चार युरोपियन कप आणि चार स्पॅनिश लीगचा समावेश आहे. यासोबत चॅम्पियन्स लीगचा समावेश आहे. त्याने मद्रिदसोबत खेळताना 4 चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकल्या आहेत. क्रुसने क्लबसोबत 463 सामने खेळले आहेत. यामध्ये 28 गोल केले आहेत, तर 98 असिस्ट केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT