स्पोर्ट्स

भारताची आज जपानशी सेमीफायनल लढत

दिनेश चोरगे

चेन्नई : येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप हॉकी 2023 स्पर्धेत यजमान भारताचा आज (शुक्रवारी) जपानशी उपांत्य सामना होणार आहे. भारताने या स्पर्धेत चार विजय आणि एका बरोबरीसह 13 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. स्पर्धेच्या राऊंड रॉबीन फेरीत भारताने चीन, मलेशिया दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांच्यावर मोठे विजय मिळवले. तर त्यांची जपानविरुद्धची लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली. स्पर्धेेची पहिली सेमीफायनल मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात आज सायं. 6 वाजता होईल. तर भारत आणि जपान यांच्यातील लढत रात्री 8.30 वा. सुरू होईल.

बुधवारी भारताने आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील आपली अपराजित परंपरादेखील कायम राखली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केलेल्या भारतीय संघाने अतिशय आत्मविश्वासाने खेळ साकारत सामन्यात पूर्णवेळ एककलमी वर्चस्व गाजवले आणि यामुळे पाकिस्तानला सातत्याने बॅकफूटवरच राहावे लागले. या निकालासह पाकिस्तानचे स्पर्धेचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग पावले. ते आज चीनविरुद्ध पाचव्या स्थानासाठी लढत देतील.

सामन्याची वेळ
रात्री 8.30 वाजता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT