साऊथॅम्पटन; पुढारी ऑनलाईन : कर्णधार केन विलियमसन व रॉस टेलर या अनुभवी जोडीने न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना भारतीय संघावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ऐतिहासिक विजयानंतर केन विलियमसन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या पराभवानंतर विलियमसनने विराटला मिठी मारत भारतीयांचे मन जिंकले. त्या दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडचा विजय होताचा विराट कोहलीने किवींचा कर्णधार केन विलियमसनला शुभेच्छा दिल्या. मात्र, विलियमसनने हातात हात न देता विराटला मिठी मारली. हा क्षण कॅमेरात टिपण्यात आला आहे. सोशल मीडियावर दोघांचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना विलियमसनने भारतीय संघाचे कौतुक केले. विराट आणि भारतीय संघाचा मी आभारी आहे. एक अविश्वसनीय संघ आहे. खूप कठीण होते विजय मिळवणे. मला आनंद आहे की आमचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. असे मत विलियमसनने यावेळी व्यक्त केले.
वर्ल्ड कप २०१९ वेळी झालेल्या दोन सुपर ओव्हमध्ये इंग्लंडचा विजय झाला. मात्र, सोशल मीडियावर केन विलियमसनने केलेल्या संघाच्या नेतृत्वाची चर्चा रंगली होती. ज्या प्रकारे त्याने संपूर्ण स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे त्याने सर्वांची मनं जिंकली होती.