लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे यंदाचे चक्र आता संपत आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 जून रोजी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ लगेचच आपल्या पुढच्या सत्राला सुरुवात करणार आहे.
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील पर्वात सहा कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यापैकी तीन कसोटी मालिका घरच्या मैदानावर होतील, तर तीन परदेशात होणार आहेत. भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांचा पाहुणचार करण्यासाठी आतुर आहे, तर त्यांना न्यूझीलंड, इंग्लंड व श्रीलंका दौर्यावर जावे लागणार आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर थेट 2025 जूनमध्ये इंग्लंड दौर्यात कसोटी खेळणार आहे. भारताच्या 2025-27 कसोटी चॅम्पियनशिप चक्रातील ही पहिली मालिका असेल. या दौर्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक इंग्लंड क्रिकेट आणि ‘बीसीसीआय’ने घोषित केले आहे. ही मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनला लीडस् येथे सुरू होईल. 2 जुलै 2025 रोजी बर्मिंगहॅमला दुसरा सामना सुरू होईल. तिसरा कसोटी सामना लॉर्डस्वर (10 जुलै), चौथा सामना मँचेस्टरवर (23 जुलै) आणि पाचवा सामना ओव्हलवर (31 जुलै) खेळवण्यात येईल. त्यानंतर भारताचे पुढील कसोटी मालिकेचे दौरे कसे असतील हे जाणून घेऊयात.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 च्या फायनलच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर आहे. आफ्रिकेला दोनपैकी एक कसोटी विजय फायनलसाठी पुरेसा आहे, तर भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील, तर ऑस्ट्रेलियाला उर्वरित 4 पैकी 3 कसोटी जिंकाव्या लागणार आहेत.
ऑस्ट्रेलिया : न्यूझीलंड, इंग्लंड, बांगला देश (होम); भारत, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका (अवे)
बांगला देश : इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान (होम); ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका (अवे)
इंग्लंड : न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान (होम); ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगला देश (अवे)
भारत : ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका (होम); न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका (अवे)
न्यूझीलंड : भारत, वेस्ट इंडीज, श्रीलंका (होम); ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान (अवे)
पाकिस्तान : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका (होम); इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगला देश (अवे)
दक्षिण आफ्रिका : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगला देश (होम); भारत, पाकिस्तान, श्रीलंका (अवे)
श्रीलंका : भारत, दक्षिण आफ्रिका, बांगला देश (होम); न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान (अवे)
वेस्ट इंडीज : ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका (होम); न्यूझीलंड, भारत, बांगला देश (अवे)