सूर्यकुमार आणखी एका टीमसोबत दिसला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Twitter
स्पोर्ट्स

सूर्यकुमार यादवने संघ बदलला? नव्या जर्सीत दिसताच चाहत्यांना धक्का

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav : टीम इंडिया नुकतीच श्रीलंका दौऱ्यावरून परतली आहे. या दौऱ्यापूर्वी सूर्यकुमार यादवची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव करत मालिका जिंकली. आता भारतीय क्रिकेट संघ 40 दिवसांपेक्षा अधिक विश्रांतीवर आहे. यानंतर टीम इंडियाचे शेड्यूल खूपच व्यस्त असणार आहे. या सगळ्यामध्ये सूर्यकुमार आणखी एका टीमसोबत दिसला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, सूर्यकुमार यादव सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि याच दरम्यान तो यँकीज स्टेडियममध्ये पोहोचला. मेजर लीग बेसबॉलच्या न्यूयॉर्क यँकीज संघाने स्टेडियममध्ये त्यांचा गौरव केला. त्याचा व्हिडिओ न्यूयॉर्क यँकीजने स्वतः सूर्यकुमारसोबत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्या स्टेडियममध्ये दिसत होता आणि त्यानंतर त्याला भेट म्हणून न्यूयॉर्क यँकीजची खास जर्सी देण्यात आली. या जर्सीवर सूर्याचा आंतरराष्ट्रीय जर्सी क्रमांकही त्याच्या नावासोबत छापण्यात आला आहे.

सूर्या ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबई संघाकडून बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेसाठी नुकताच 17 सदस्यीय संघ जाहीर केला होता, ज्याचे नेतृत्व सध्या सरफराज खानकडे सोपवण्यात आले आहे.

टीम इंडियाची पुढची मालिका कधी आहे?

टीम इंडिया आता 19 सप्टेंबरपासून ॲक्शनमध्ये दिसणार आहे. संघाची पुढील लढत बांगलादेश संघाशी होणार आहे. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने होतील. कसोटी मालिका 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर आणि टी-20 मालिका 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT