T20 विश्वचषक अंतिम सामन्यानंतर रविवारी ( ३० जून) बार्बाडोसमध्ये वादळ धडकले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतर तीन दिवस भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसमध्येच अडकून पडला होता. अखेर आज ( दि. ३ जुलै) टीम इंडिया बार्बाडोसहून विशेष चार्टर्ड विमानाने भारताकडे रवाना झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे गुरुवारी (४ जुलै) सकाळी नवी दिल्ली विमानतळावर आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता भारतीय संघाची भेट घेणार आहेत.
T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये आलेल्या वादळामुळे भारतीय संघाला रविवारपासून बार्बाडोसमध्ये राहावे लागले. टीम भारतीय संघ तीन दिवस येथील हॉटेलमध्ये अडकला होता. सुरक्षेसाठी कर्फ्यू लावण्यात आला होता. बीसीसीआयने विशेष चार्टर्ड फ्लाइट पाठवून टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था केली.
विश्वविजेत्या भारतीय संघाने रविवारी २९ जून रोजी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाने १७ वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. त्याच वेळी, 2013 नंतर, संघाने एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. 2023 मध्ये भारतीय संघाला दोनदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
बुधवारी भारतीय संघ बार्बाडोसहून विशेष चार्टर्ड फ्लाइटने भारतात रवाना झाला. टीम इंडियाचे गुरुवार, ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावर आगमन होईल. टीम इंडिया सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रवाना होईल. येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी हे टीम इंडियाशी संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भेटीनंतर भारती संघ चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून संघ वानखेडे स्टेडियमवर जाईल. त्यानंतर आयकॉनिक स्टेडियमपर्यंत 1 किमी लांबीची बस परेड होईल, यानंतर कर्णधार रोहित शर्मा टी20 विश्वचषक ट्रॉफी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे सुपूर्द करेल.