स्पोर्ट्स

IND vs WI : टीम इंडियाची फुल टू धमाल

Arun Patil

बार्बाडोस, वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी (IND vs WI) भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसला पोहोचला आहे. संघ 12 जुलैपासून पहिली कसोटी खेळणार आहे. यासाठी त्यांचा सराव सुरू झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सराव करण्यापूर्वी खेळाडूंनी बार्बाडोस बीचवर मस्ती केली. सगळे एकत्र व्हॉलीबॉल खेळत सराव करत आहेत. विराट कोहली, इशान किशन आणि राहुल द्रविड यांच्यासह बहुतेक खेळाडू आणि कोचिंग स्टाफने व्हॉलीबॉल खेळण्याची मजा लुटली. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

1 मिनीट 46 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पहिले विमान दिसत आहे, ज्यामधून टीम इंडिया बार्बाडोसला पोहोचली. इशान किशन, के. एस. भरत, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणेसह बहुतेक खेळाडू भारतातून बार्बाडोसला आले होते. दुसरीकडे विराट कोहली, रोहित शर्मासह काही खेळाडू सुट्टी संपवून तेथून थेट बार्बाडोसला पोहोचले होते. त्यानंतर या व्हिडीओमध्ये बार्बाडोस बीचवर खेळाडू व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये विराट कोहली, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद सिराज असे खेळाडू दिसत आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह संपूर्ण कोचिंग स्टाफ त्याच्यासोबत व्हॉलीबॉल खेळत आहे. (IND vs WI)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT