स्पोर्ट्स

Team India 2024-25 Schedule : बीसीसीआयने टीम इंडियाचे नवे वेळापत्रक केले जाहीर! ‘हे’ 3 संघ येणार भारत दौऱ्यावर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India 2024-25 Schedule : बीसीसीआयने टीम इंडियाच्या 2024-25 च्या देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा हंगाम सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने सुरू होईल. पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होईल. त्यानंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ज्याचे सामने धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

बांगलादेशनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात येणार (Team India 2024-25 Schedule)

टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यातील पहिली कसोटी 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे खेळवली जाणार आहे. त्यानंतर पुणे आणि मुंबईमध्ये अनुक्रमे दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळवला जाईल.

इंग्लंडचाही दौरा (Team India 2024-25 Schedule)

पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल. या मालिकेत 5 टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला टी-20 सामना 22 जानेवारीपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. 25 जानेवारीला कोलकाता येथे दुसरा आणि तिसरा सामना 28 जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना 31 जानेवारीला पुण्यात होणार आहे. शेवटचा आणि पाचवा सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत खेळवला जाणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारीला नागपुरात, दुसरा सामना 9 फेब्रुवारीला कटकमध्ये आणि शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

SCROLL FOR NEXT