स्पोर्ट्स

Team India चे कोच अचानक बदलेले, व्‍ही. व्‍ही. एस. लक्ष्‍मण देणार भारतीय संघाला धडे; आशियाई स्‍पर्धा निशाण्यावर

रणजित गायकवाड

नवी दिल्‍ली : जपानमधील आयची-नागोया येथे रंगणाऱ्या आगामी ‘आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६’साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा पुन्हा एकदा व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ‘बीसीसीआय’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे संचालक असलेले लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या प्रशिक्षकांच्या यादीतून करण्यात आली.

नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेत व्यस्त असणार असल्याने लक्ष्मण यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

या मोहिमेत लक्ष्मण यांच्यासोबत सहायक म्हणून सुनील जोशी, हृषीकेश कानिटकर आणि शुभदीप घोष हे काम पाहतील. लक्ष्मण यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने २०२३ च्या हँग्‍झू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते; त्यामुळे यंदाही त्यांच्याकडून विजेतेपद राखण्याची अपेक्षा आहे.

दुसऱ्या बाजूला, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार कायम असून, त्यांना गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बळी यांची साथ लाभेल. स्पर्धेतील क्रिकेटचे सामने २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, भारतीय पुरुष संघ २८ सप्टेंबरला पहिला सामना खेळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT