पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने मंगळवारी (15 एप्रिल) भारतीय संघाच्या बांगलादेश दौ-याचे वेळापत्रक जाहीर केले. या ऑगस्ट महिन्यात इंग्लंड विरुद्धची कसोटी संपल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करेल. दोन्ही देशांमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. (India vs Bangladesh ODI and T20I Series)
बांगलादेशचा हा दौरा 17 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 31 ऑगस्टपर्यंत चालेल. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. एकदिवसीय मालिकेतील तीन सामने 17, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी खेळवले जातील, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामने 26, 29 आणि 31 ऑगस्ट रोजी खेळवले जातील. हे सहा सामने मीरपूर आणि चितगाव येथे खेळवले जातील.
17 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. हा सामना मीरपूरमध्ये खेळला जाईल. सध्या सर्व भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 18 व्या हंगामात खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर, टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या दौ-यावर जाणार आहे.
17 ऑगस्ट : मीरपूर
20 ऑगस्ट : मीरपूर
23 ऑगस्ट : चितगाव
26 ऑगस्ट : चितगाव
29 ऑगस्ट : मीरपूर
31 ऑगस्ट : मीरपूर
सध्या सर्व भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 18व्या हंगामात खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर, टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करेल. उभय संघांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सामने खेळवले जातील. ही मालिका 4 ऑगस्ट रोजी संपेल. भारतीय संघाचा देशांतर्गत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येईल.
भारताचा घरचा हंगाम 2 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होईल. यानंतर, द. आफ्रिकेचा संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. दोन घरच्या मालिकांनंतर, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल जिथे तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या महिन्याच्या सुरुवातीला मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले होते. वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून तर टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल.