स्पोर्ट्स

Virat Kohli Dance : विराट-अर्शदीपचे भांगडा सेलिब्रेशन! ‘तुनक-तुनक’ गाण्यावर लुटली मैफील

भारतीय खेळाडूंनी गाजवले बार्बाडोसचे मैदानात

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Dance T20 World Cup : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओंचा पूर आला आहे. 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय खेळाडूंसह चाहत्यांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली आहे. सामना संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपला आनंद व्यक्त करण्याची एकही संधी सोडली नाही. यादरम्यान, विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघेही बार्बाडोसच्या मैदानावर दिलेर मेहंदीच्या 'तुनक टुनक' या प्रसिद्ध गाण्यावर उत्साहात भांगडा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद हे देखील दिसत आहेत.

भारताने 2013 नंतर पहिली ICC ट्रॉफी, 2011 नंतर पहिला विश्वचषक आणि 2007 नंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. या या विजेतेपदानंतर टीम इंडियाचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याकडे टीम इंडियाच्या एका युगाचा अंत म्हणूनही पाहिले जात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टी-20 विश्वचषक खेळण्याबाबत शंका होत्या, पण या दोन दिग्गजांनी शेवटच्या वेळी या फॉरमॅटमध्ये नशीब आजमावले आणि त्याचे फळही त्यांना मिळाले.

अंतिम सामन्यात कोहलीला सामनावीर

अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि विराट कोहलीच्या 76 धावांच्या जोरावर 176 धावा फलकावर झळकावल्या. त्याच्याशिवाय अक्षर पटेलने 47 धावांची खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकेकाळी टीम इंडियाला बळ दिले होते. संघाला विजयासाठी शेवटच्या 30 चेंडूंमध्ये फक्त 30 धावांची गरज होती. परंतु त्यानंतर चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाचा डाव फसला आणि भारताने त्यांना 20 षटकांत 169 धावांवर रोखले. टीम इंडियाने हा सामना 7 धावांच्या फरकाने जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT