टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने धावफलकावर मोठी धावसंख्या झळकवली.  Twitter
स्पोर्ट्स

T20 World Cup Final : टीम इंडियाने रचला सर्वाधिक धावांचा विक्रम!

रणजित गायकवाड

T20 World Cup Final : टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने धावफलकावर मोठी धावसंख्या झळकवली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र भारतीय फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. या खेळीदरम्यान टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप फायनलचा मोठा विक्रमही मोडला.

टीम इंडियाने फायनलचा मोठा विक्रम मोडला

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची अवस्था बिकट झाली होती. संघाने कोरड्या आणि संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये अवघ्या 34 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव स्वतात बाद झाले होते; पण यानंतर विराट कोहलीने अक्षर पटेल, शिवम दुबे यांच्या साथीने संघाचा डाव सावरला. विराटने सर्वाधिक 76 धावा केल्या. या दमदार पुनरागमनामुळे भारताला 20 षटकात 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारता आली, जी टी-20 विश्वचषकाच्या फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. याआधी 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना 173 धावा केल्या होत्या.

टी-20 विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या

  • भारत 7 बाद 176 : विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाउन (2024)

  • ऑस्ट्रेलिया 2 बाद 173 : विरुद्ध न्यूझीलंड, दुबई (2021)

  • न्यूझीलंड 4 बाद 172 : विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई (2021)

  • वेस्ट इंडिज 6 बाद 161 : विरुद्ध इंग्लंड, कोलकाता (2016)

  • भारत 5 बाद 157 : विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग (2007)

विराट कोहली-अक्षर पटेलचा धमाका

टीम इंडियासाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 59 चेंडूत 76 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर अक्षर पटेलने 31 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. त्याने या खेळीत 1 चौकार आणि 4 षटकार ठोकले. दुसरीकडे, शिवम दुबेनेही 16 चेंडूत 27 धावांची खेळी केली.

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वोच्च धावसंख्या

  • 85 धावा : केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2021)

  • 85 धावा : मार्लन सॅम्युअल्स विरुद्ध इंग्लंड (2016)

  • 78 धावा : मार्लन सॅम्युअल्स विरुद्ध श्रीलंका (2012)

  • 77 धावा : मिचेल मार्श विरुद्ध न्यूझीलंड (2021)

  • 77 धावा : विराट कोहली विरुद्ध श्रीलंका (2014)

  • 76 धावा : विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2024*)

  • 75 धावा : गौतम गंभीर विरुद्ध पाकिस्तान (2007)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT