स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 : श्रीलंकेचा ओमानवर 105 धावांनी दणदणीत विजय

शनाकाचे 19 चेंडूंत अर्धशतक, रत्नायके-मेंडिसचीही फटकेबाजी

रणजित गायकवाड

पल्लेकेल्ले : टी-20 विश्वचषकात श्रीलंकेच्या फलंदाजांनी ओमानच्या गोलंदाजीची पिसे काढत 105 धावांनी मोठा विजय नोंदवला. रत्नायकेचे धडाकेबाज पहिले अर्धशतक आणि दासून शनाकाच्या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 5 बाद 225 अशी या हंगामातील सर्वोƒ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात ओमानला 20 षटकांत 9 बाद 120 धावांवर समाधान मानावे लागले. या विजयासह लंकेने ‌‘ड‌’ गटात सलग दोन विजयांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

कर्णधार दासून शनाकाने अवघ्या 19 चेंडूंत अर्धशतक झळकावले, हे ठळक वैशिष्ट्य ठरले. लंकेकडून विश्वचषकातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. सलामीवीर रत्नायकेनेही कारकिर्दीतील पहिले तर कुशल मेंडिसने (61) सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. अखेरच्या 4 षटकांत श्रीलंकेने 65 धावा कुटल्या. 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानचा डाव सातत्याने गडगडत राहिला. चमिरा (2/19), तिक्षणा (2/11) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

मोहम्मद नदीमचे 43 व्या वर्षी अर्धशतक

आयसीसी टी-20 विश्वचषकात मोहम्मद नदीम अर्धशतक झळकावणारा सर्वात ज्येष्ठ फलंदाज ठरला. त्याने 43 वर्षे, 161 दिवस वय असताना हा पराक्रम गाजवला. मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ न लाभल्याने ओमानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

टी-20 विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतके

  • 12 चेंडू : युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड (2007)

  • 17 चेंडू : स्टीफन मायबर्ग विरुद्ध आयर्लंड (2014)

  • 17 चेंडू : मार्कस स्टॉईनिस विरुद्ध श्रीलंका (2022)

  • 18 चेंडू : ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध पाकिस्तान (2014)

  • 18 चेंडू : के. एल. राहुल विरुद्ध स्कॉटलंड (2021)

  • 18 चेंडू : शोएब मलिक विरुद्ध स्कॉटलंड (2021)

  • 19 चेंडू : रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2024)

  • 19 चेंडू : दासून शनाका विरुद्ध ओमान (2026)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT