T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup: भारत-पाकचा हाय व्होल्टेज सामना कधी होणार? कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये? पाहा संपूर्ण माहिती

ICC to Announce T20 World Cup 2026 Schedule Today: टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत होणार असून आयसीसी आज संध्याकाळी 6:30 वाजता अधिकृत शेड्यूल जाहीर करणार आहे.

Rahul Shelke

T20 World Cup 2026 Schedule: टी20 विश्वचषक 2026 यंदा भारत आणि श्रीलंकेत खेळला जाणार आहे. मागील विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला होता. या वेळी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार असेल आणि चाहत्यांना विशेषत: भारत–पाक सामन्याची मोठी उत्सुकता आहे. आयसीसी या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक आज जाहीर करणार आहे.

भारत–पाक सामना कधी होणार?

रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धेतील सर्वात जास्त चर्चेत असलेली लढत असणार आहे.

आयसीसी शेड्यूल कधी जाहीर करणार?

टी20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता जाहीर केले जाईल. या घोषणेपूर्वीच सर्व टीम्स, प्रसारमाध्यमे आणि चाहते सज्ज झाले आहेत.

भारत कोणत्या ग्रुपमध्ये?

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताचा ग्रुप असा असू शकतो:

  • भारत

  • पाकिस्तान

  • अमेरिका

  • नेदरलँड्स

  • नामिबिया

भारतातील सर्व ग्रुप सामने भारतात होतील, तर पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले जातील.

टीम इंडियाचे संभाव्य सामने

रिपोर्ट्सनुसार भारताचे सामने असे असू शकतात:

  • 7 फेब्रुवारी – मुंबई: भारत vs अमेरिका

  • 12 फेब्रुवारी – दिल्ली: भारत vs नामिबिया

  • 15 फेब्रुवारी – कोलंबो: भारत vs पाकिस्तान

  • 18 फेब्रुवारी – अहमदाबाद: भारत vs नेदरलँड्स

यापैकी भारत–पाक सामना श्रीलंकेत होणार आहे.

20 संघांमध्ये स्पर्धा

ही स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान खेळली जाईल. 20 टीम्स यात उतरतील, ज्यात भारत–श्रीलंका व्यतिरिक्त खालील टीम्स असतील:

अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, साउथ आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि यूएई. ग्रुप स्टेजनंतर 8 टीम्स पुढील फेरीत जातील. त्यानंतर दोन गट, सेमीफायनल्स आणि शेवटी फाइनल सामना खेळला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT