T20 WC IND vs SA Final
बार्बाडोस येथे भारत विरुद्ध द. आफ्रिकेमध्ये टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला जात आहे Twitter
स्पोर्ट्स

T20 WC INDvsSA Final : भारत विश्वविजेता, द. आफ्रिका पुन्हा चोकर्स

रणजित गायकवाड

दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का

दक्षिण आफ्रिकेला 17 व्या षटकात 151 धावांवर पाचवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याने 27 चेंडूत 52 धावांची मॅच चेंजिंग इनिंग खेळली.

दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का

दक्षिण आफ्रिकेला 13व्या षटकात 106 धावांवर चौथा धक्का बसला. अर्शदीप सिंगने क्विंटन डी कॉकला कुलदीपकरवी झेलबाद केले. डी कॉकने 31 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर क्रीजवर आला. 13 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 109 होती.

अक्षर पटेलने स्टब्स-डी कॉकची भागीदारी तोडली

70 धावांच्या स्कोअरवर. आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. अक्षर पटेलने नवव्या षटकात ट्रिस्टन स्टब्सला बोल्ड केले. 21 चेंडूत 31 धावा करून तो बाद झाला. स्टब्सने डी कॉकसोबत तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. हेनरिक क्लासेन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

द. आफ्रिकेचा कर्णधार मार्कराम तंबूत

दक्षिण आफ्रिकेला तिसर्‍या षटकात अर्शदीप सिंगने दुसरा धक्‍का दिला. कर्णधार मार्करामला यष्‍टीरक्षक पंतकडे झेल देण्‍यास भाग पाडले. त्‍याने चार धावा केल्‍या.

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्‍का

दुसर्‍या षटकात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्‍का बसला. बुमराहने चार धावा खेळत असलेल्‍या हेंड्रिक्सला क्‍लिन बोल्‍ड केले.

भारताचे द. आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य

सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 176 धावा केल्या. द. आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी 177 कराव्या लागणार आहेत. भारताने वेगवान सुरुवात केली, पण एकापाठोपाठ एक तीन गडी गमावल्याने संघ अडचणीत सापडला. येथून पुढे विराट कोहली आणि अक्षर पटेलने डाव सावरला. दोघांमध्ये 72 धावांची भागिदारी झाली. अक्षर दुर्दैवी ठरला त्याला यष्टीरक्षक डिकॉकने अचून थ्रो करत धाव बाद केले. येथून पुढे विराटने शिवम दुबेच्या साथीने धावफलक हलता ठेवला. एका टोकाकडून दुबे अक्रमक खेळी करत होता. पण विराटने संथ खेळी केली. त्याने 48 चेंडून 50 धावा पूर्ण केल्या. अर्धशतकी मजल मारल्यानंतर विराटने गिअर बदला आणि चौकार षटकार लगावले. यादरम्यान तो 76 धावांवर बाद झाला.

भारताला पाचवा धक्का

विराट कोहलीच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. तो 76 धावा करून बाद झाला. 163 धावांच्या स्कोअरवर मार्को जॅनसेनने त्याला झेलबाद केले. कोहली आणि दुबे यांच्यात पाचव्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी केली.

कोहलीचे 48 चेंडूत अर्धशतक

विराट कोहलीने 2024 च्या टी-20 विश्वचषकातील पहिले अर्धशतक 48 चेंडूत झळकावले. 17 षटकांनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 134 आहे.

भारताला चौथा धक्का

अक्षर पटेलच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला क्विंटन डी कॉकने धावबाद केले. अक्षरने 31 चेंडूत 47 धावा केल्या. शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

कोहली-अक्षरने सावरले

पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावलेल्या भारतीय संघाचा डाव विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी सावरला. दोघांनी 12 व्या षटकाअखेर 3 बाद 93 पर्यंत मजल मारली.

पॉवरप्लेमध्ये तीन बाद 45 धावा

पॉवरप्ले ओव्हर्स संपल्या आहेत. भारताची धावसंख्या तीन बाद 45 आहे. अक्षर पटेल आणि विराट कोहली मैदानात आहेत.

सूर्यकुमार यादवही बाद

अंतिम सामन्यात टीम इंडिया गंभीर संकटात सापडली आहे. रबाडाने पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्या सीमारेषेवर झेलबाद झाला. हेनरिक क्लासेन त्याचा झेल पकडला. यावेळी भारताची धानसंख्या 34 होती. सूर्या केवळ तीन धावा करू शकला. अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

सूर्याने खेळला धोकादायक शॉट

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोखमीचा शॉट खेळला. चेंडू बराच उशीरापर्यंत हवेत राहिला. त्यावेळी मिड-ऑनला उभा असलेला फिल्डर झेल पकडण्यासाठी सरसावला. पण सुदैवाने चेंडू फिल्डरपासून खेळाडूपासून दूर पडला.

पंत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला

केशव महाराजने भारताला दुसरा धक्का दिला. त्याने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतला विकेटकीपर क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. पंत खाते न उघडताच तंबूत परतला. पंत बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रिजवर आला.

पहिली विकेट 23 धावांवर पडली

केशव महाराजच्या षटकात आक्रमक सुरुवात केल्यानंतर कर्णधार रोहित त्याचा बळी ठरला. लेग साईडवर आक्रमक शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो हेनरिक क्लासेनच्या हाती झेलबाद झाला. रोहितने 5 चेंडूत 9 धावा केल्या.

केशव महाराजचे चौकाराने स्वागत

दुसरे षटक टाकण्यासाठी केशव महाराज आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले.

कोहलीची आक्रमक सुरुवात

विराट कोहलीने पहिल्याच षटकात तीन उत्कृष्ट चौकार मारले. एका षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद 15 होती.

बार्बाडोसची खेळपट्टी कशी आहे?

बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानाची खेळपट्टी टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संतुलित पृष्ठभाग प्रदान करते. या मैदानावर विश्वचषकाचे एकूण आठ सामने खेळले गेले. ज्यामध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सुपर 8 फेरीतील सामन्याचा समावेश आहे. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 181 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरार अफगाण संघाला लक्ष्य गाठता आले नाही आणि त्यांचा 47 धावांनी पराभव झाला. मात्र, गेल्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजांनी पहिल्या डावात वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या डावात फलंदाजांनी मुक्तपणे धावा केल्या. येथे खेळल्या गेलेल्या 50 टी-20 सामन्यांपैकी धावांचा पाठलाग करणा-या संघांनी केवळ 16 सामने जिंकले आहेत, त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेक महत्त्वाचे ठरले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, खेळादरम्यान पावसाची 50 टक्के शक्यता आहे, जे दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 खालीलप्रमाणे

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना पुन्हा एकदा बाहेर बसावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका संघाने देखील कोणताही बदल केलेला नाही.

बार्बाडोसमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी आहे?

द. आफ्रिकेने बार्बाडोस येथे आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. या तीनपैकी दोन त्यांनी जिंकले आहेत. त्याचवेळी त्यांना एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. 2010 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान आफ्रिकन संघाने हे सर्व सामने खेळले होते. त्यादरम्यान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचवेळी आफ्रिकन संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

भारतीय संघ बार्बाडोसला पोहोचला

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अंतिम सामन्यासाठी स्टेडियमवर पोहोचले आहेत. बार्बाडोसमधील हवामान स्वच्छ दिसते. ही चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. अशा स्थितीत नाणेफेक वेळेवर होणे अपेक्षित आहे.

IND vs SA T20 World Cup Final Update

शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत थरार उत्कंठावर्धक आणि प्रत्येक भारतीयाला प्रार्थना करायला भाग पडलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. तब्बल 13 वर्षांनी आयसीसी ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली आणि दुस-यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. बर्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात रोहित सेनेने तगड्या द. आफ्रिकेवर 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरला आणि 34 धावांपर्यंत 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. सर्वात मोठी खेळी विराट कोहलीने (76) खेळली. त्याच्याशिवाय अक्षर पटेलने 47 धावा केल्या. भारताने 7 गडी गमावून 176 धावा केल्या. केशव महाराज आणि एनरिक नॉर्सियाने 2-2 बळी घेतले. हेनरिक क्लासेनची (52) खेळी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देऊ शकली नाही. जसप्रीत बमुराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या.

हार्दिक पंड्याचा 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना

हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये एक मोठी कामगिरी केली. 100 वा T-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला. त्यांच्याशिवाय फक्त रोहित शर्मा (159) आणि विराट (125) यांनी भारतासाठी 100 हून अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय 90 हून अधिक सामने महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहेत. धोनीनंतर भुवनेश्वर कुमार (87) याने सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

कोहलीचे पहिले अर्धशतक

कोहलीने 59 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 2 षटकार आले. त्याचा स्ट्राइक रेट 128.81 होता. त्याने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे या विश्वचषकातील हे पहिले अर्धशतक होते आणि टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक होते. त्याने टी-20 विश्वचषकातील 15 वे अर्धशतक झळकावले. अक्षरासोबत त्याने 54 चेंडूत 72 धावा आणि शिवम दुबेसोबत 33 चेंडूत 57 धावा जोडल्या.

SCROLL FOR NEXT