सूर्यकुमार यादव File photo
स्पोर्ट्स

सूर्यकुमारने निवडले जगातील 'टॉप'चे तीन क्रिकेटपटू, 'हा' दिग्गज अग्रस्‍थानी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आज (दि. १४ सप्‍टेंबर) आपला ३४ वाढदिवस साजरा करत आहेत. (Suryakumar Yadav Birthday) फलंदाजातीलील स्फोटक शैलीने आणि धडाकेबाज फटकेबाजीने भारतीय क्रिकेट विश्‍वात 'मिस्टर ३६०' अशीही त्‍याची ओळख आहे. सूर्यकुमारने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत डेव्हिड मिलरचा अवघड झेल घेत भारताला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्टार स्पोर्ट्स शोमध्ये सध्याच्या क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या तीन आवडत्या क्रिकेटपटूंची नावे त्‍याने जाहीर केली आहेत.

सूर्यकुमार यादव हा भारताच्या T-20 संघाचा कर्णधार आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यात यश मिळवले. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यानंतर सूर्याला भारताचा नवा T20 कर्णधार बनवण्यात आले आहे.

Suryakumar Yadav : कोण आहेत 'ते' तीन टाॅपचे क्रिकेटपटू?

'स्टार स्पोर्ट्स शो'मध्ये बोलताना सूर्याने प्रथम सचिन तेंडुलकर हे आदर्श असल्‍याचे सांगितले. तर अफगाणिस्‍तानचा फिरकीपटू राशिद खान याच्‍या चेंडूंचा सामना करणे आव्‍हानात्‍मक असले तरी त्‍याला खेळताना मजा येते असल्‍याचे तो सांगतो. सूर्याने महेंद्रसिंह धोनी त्‍याने निवडलेल्‍या तीन टॉप क्रिकेटपटूमध्‍ये पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा तर तिसर्‍या स्‍थानी विराट कोहलीचे नाव घेतले आहे. आपल्या कारकिर्दीतील भारतीय क्रिकेट संघातील निवड हा सर्वात संस्मरणीय क्षण होता, असेही तो नम्रपणे नमूद करतो.

Suryakumar Yadav : भारताचे 'मिस्टर 360' 

फलंदाजातीलील स्फोटक शैलीने आणि धडाकेबाज फटकेबाजीने भारताचा 'मिस्टर ३६०' अशीही त्‍याची ओळख आहे. सूर्यकुमार असे काही फटके मारतो की गोलंदाजांबरोबर चाहतेही अवाक होतात. अशक्‍य ते शक्‍य करण्‍याची कमाल करणारा फलंदाज अशी त्‍याने आपली ओळख निर्माण केली आहे. क्रिकेटमधील टी-20 फॉर्मेटमध्‍ये चार किंवा त्याहून अधिक शतके करणारा सूर्यकुमार हा जगातील तिसरा फलंदाज आहे. त्‍याने T20I मध्ये एकूण १६ वेळा सामनावीराचा बहुमान मिळवला आहे. सूर्यकुमार हा कोहली आणि विरनदीप सिंग (मलेशिया) यांच्यासोबत T20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वाधिक सामनावीर विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत शीर्षस्थानी आहे.

वसीम अक्रम सूर्यकुमारला मानतो टी-२० क्रिकेटमधील बादशाह

सूर्यकुमार यादव हा T-20 क्रिकेटमधील बादशाह आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्‍याचासारखा कोणी दुसरा नाही. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे कोणत्याही गोलंदाजाला अवघड आहे, असे पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने म्‍हटलं हाेते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT