ऋषभ पंत लवकरच दिसणार 'पिवळ्या' जर्सीमध्ये? Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Rishab Pant : रिषभ पंत लवकरच दिसणार 'पिवळ्या' जर्सीमध्ये? सुरेश रैनाने दिले 'हे' संकेत!

जिओ सिनेमाशी बोलताना रैनाने केला खुलासा

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. रिषभ पंत कोणत्या संघाकडून पुढच्या हंगामात खेळणार याबद्दल त्याने वक्तव्य केले आहे, गुरुवारी (दि.31) आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दहा संघांकडून रिटेन केल्ल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून रिषभ पंतला रिलिज करण्यात आले आहे. यानंतर तो आता कोणत्या संघातून खेळणार यावर क्रिकेट विश्वामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. आता यावर सुरेश रैनाने तो कोणत्या संघांत खेळणार यांचे संकेत चाहत्यांना दिले आहे.

जिओ सिनेमाशी बोलताना रैना म्हणाला, "मी दिल्लीत एमएस धोनीला भेटलो, पंतही तिथे होता. मला वाटते की काहीतरी मोठे घडणार आहे. कोणीतरी असेल. तो लवकरच पिवळी जर्सी घालेन." पंत सीएसकेकडे जात असल्याच्या अनेक माध्यमांच्या वृत्तांदरम्यान हे समोर आले आहे. ही हालचाल झाली तर आश्चर्य वाटणार नाही. आपल्या कारकिर्दीच्या संधिप्रकाशात 43 वर्षीय धोनीसह, पंत फ्रँचायझीसाठी पुढचा मोठा विकला जाणारा चेहरा, त्यांचा यष्टिरक्षक फलंदाज किंवा गरज भासल्यास कर्णधार बनू शकतो. असे देखील त्याने सांगितले आहे.

आठ सिझन नंतर दिल्लीने पंतला केले रिलिज

रिषभ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये खेळताना दिसू शकतो. कारण, दोन दिवसांपूर्वी त्याने दिल्ली येथे पूर्व भारतीय कर्णधार एमएस धोनीची भेट घेतली. प्रीमियर लीग (आयपीएल) च्या खेळाडूंना कायम ठेवण्याच्या याद्या प्रत्येक फ्रँचायझीने गुरुवारी जाहीर केल्या. धोनीला नवीन IPL नियमानुसार 4 कोटी रुपयांमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या भारतीय खेळाडूंना फ्रँचायझींनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येते. 2016 पासून संघासोबत आठ सीझन खेळल्यानंतर पंतला दिल्ली कॅपिटल्सने (DC) रिलीज केले आहे.

दिल्लीसाठी खेळताना पंतची आकडेवारी

दिल्लीकडून पंतने एकून 111 सामने खेळले आहेत. त्यामध्ये पंतने 148.93 च्या सरासरीने 3 हजार 284 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या नावावर एक शतक आणि 17 अर्धशतक आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२८* आहे. तसेच तो फ्रँचायझीचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, DC 2021 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली 2022 आणि 2024 मध्ये लीग टप्प्यांच्या पुढे प्रगती करू शकला नाही. मागील मोसमात, पंतने फ्रँचायझीसाठी 13 सामन्यांत 40 पेक्षा जास्त सरासरीने आणि 155 च्या वरच्या स्ट्राइक रेटने 446 धावा केल्या. त्याने तीन अर्धशतके झळकावली आणि 88* ही सर्वोत्तम धावसंख्या होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT