स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : रोहितच्या ९२ धावांवर सुनील गावस्‍कर नाराज!; 'हिटमॅन'च्या निवृत्तीबद्दल व्यक्त केली अनोखी इच्छा!

Sunil Gavaskar on Rohit Sharma Retirement : रोहितचे ३६वे एकदिवसीय शतके हुकले

पुढारी वृत्तसेवा

Sunil Gavaskar on Rohit Sharma Retirement : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा ९२ धावांवर बाद झाला. शतकाने हुलकावणी दिल्‍यानंतर क्रिकेटपटू सुनील गवासकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहितच्या या खेळीनंतर गावस्‍कारांनी त्याच्या निवृत्तीच्या उद्दिष्टाबद्दल एक रंजक वक्तव्य केलं आहे.

रोहितच्‍या नावावर ३५ एकदिवसीय शतके

न्यू चंदीगड येथे झालेल्या या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रोहितने ९२ धावांची खेळी केली असली तरी अवघ्या ८ धावांनी त्याचे शतक हुकले. सध्या ३८ वर्षांच्या रोहितच्या नावावर ३५ एकदिवसीय शतके आहेत.

त्‍याच्‍या वयापेक्षा त्‍याच्‍या वनडे शतकांची संख्‍या जास्‍त असावी...

'जिओस्टार'च्या विशेष कार्यक्रमात बोलताना गावस्‍कर म्हणाले, "रोहित ९२ वर बाद झाल्याचे पाहून मला खूप वाईट वाटले. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो क्रिकेटला अलविदा करेल असे वाटते. पण जेव्हा तो निवृत्त होईल, तेव्हा त्याच्या वयापेक्षा त्याच्या एकदिवसीय शतकांची संख्या जास्त असावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

मीसुद्धा तीनदा ९० च्या घरात बाद झालो

शनिवारच्‍या सामन्यात शतक झाले असते तर तो ३६ व्या शतकासह या लक्ष्याच्या जवळ पोहोचला असता. माझ्या शेवटच्या वर्षात मीसुद्धा वयाइतकी कसोटी शतके ठोकण्याचा प्रयत्न करत होतो, पण तीनदा ९० च्या घरात बाद झालो. त्यामुळे मला रोहितकडून ही अपेक्षा आहे."

रोहितच्या फलंदाजीत बदल

२०२३ च्या विश्वचषकातील रोहित आणि आजचा रोहित यांच्या फलंदाजीच्या शैलीत बदल झाल्याचेही गावस्‍करांनी नमूद केले. ते म्हणाले, "२०२३ च्या विश्वचषकात रोहित पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळायचा आणि विकेटची पर्वा न करता फटकेबाजी करायचा; पण आता त्याला स्वतःच्या विकेटचे महत्त्व कळले आहे. तो फक्त ३०-४० धावा करणारा फलंदाज नसून मोठी शतके ठोकणारा खेळाडू आहे. तो ७०-८० चेंडूंत शतक ठोकू शकतो, याचा संघालाही फायदा होतो आणि संथ फलंदाजीच्या टीकेपासून तो दूर राहतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT